ठळक मुद्देसोनम व दुलकर ‘द झोया फॅक्टर’ या सिनेमात एकत्र दिसले होते.

चित्रपटांतले बोल्ड आणि इंटिमेट सीन आता नवे नाहीत. कथेची मागणी या नावाखाली सिनेमात बोल्ड सीन्सचा भरणा केला जातो आणि त्या जोरावर चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. आता तर छोट्या पडद्यावरच्या मालिकांमध्येही सर्रास बोल्ड व इंटिमेट सीन्स दिसू लागले आहेत. बॉलिवूडचे अनेक स्टार्स या बोल्ड सीन्ससाठी ओळखले जातात. पण अनेकांची हे बोल्ड सीन्स देताना दमछाक होते. असे सीन्स शूट करताना हे स्टार्स नर्व्हस होतात. अभिनेता दुलकर सलमान यापैकीच एक.


नुकताच दुलकर नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या चॅट शोमध्ये सहभागी झाला. यावेळी त्याने स्वत:बद्दलच्या अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. पडद्यावर बोल्ड सीन्स देताना काय अवस्था होते, हेही त्याने शेअर केले.


‘सिनेमात बोल्ड सीन्स देताना मी प्रचंड नर्व्हस असतो. माझे हातपाय थरथर कापायला लागतात. माझी को-स्टार काय विचार करत असेल? असा विचार करून मी आणखीच नर्व्हस होतो. मी नेकेड आहे आणि ती माझ्या आत झाकून बघतेय, असे मूर्खपणाचे विचार त्याक्षणी माझ्या डोक्यात येतात. त्यामुळे असे सीन शूट करताना मी नेहमी मोठ्या हुशारीने माझे हात माझ्या हिरोईनच्या केसांमागे लपवतो. रिअल लाईफमध्ये प्रेम व्यक्त करणे सोपे असते. पण कॅमे-यासमोर प्रेम व्यक्त करणे माझ्यासाठी सर्वात कठीण होते,’असे दुलकरने यावेळी सांगितले.


सोनम कपूरसोबत शूट केल्या गेलेल्या इंटिमेट सीन्सबद्दलही तो बोलला. सोनम कपूरसोबत इंटिमेट सीन शूट करताना मी तुलनेने अधिक कम्फर्टेबल होतो. ती खूप गोड आहे,असेही त्याने सांगितले.
सोनम व दुलकर ‘द झोया फॅक्टर’ या सिनेमात एकत्र दिसले होते. या सिनेमात दुलकरने क्रिकेटरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात दोघांचा आॅनस्क्रिन रोमान्स पाहायला मिळाला होता.

Web Title: bollywood actor dulquer salmaan talks about doing intimate scenes in films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.