ठळक मुद्देआफताबची पत्नी नीन ही अभिनेता कबीर बेदीची साळी आहे. कबीरने नीनची बहीण परवीन दुसांजसोबत लग्न केले आहे.

बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. आफताब व त्याची पत्नी नीन यांना शनिवारी कन्यारत्न झाले. आफताबने स्वत: ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आफताबने एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली. या फोटोत आफताब व नीनच्या चिमुकलीचे चिमुकले पाय दिसत आहेत.
त्याने लिहिले, ‘ आमच्या जमीनीवर परमेश्वराने स्वर्ग पाठवला. नीन आणि मी एका गोंडस कन्येचे आईबाबा झालो आहोत. आता आमच्या कुटुंबात आम्ही तिघे असू...’

आफताबने ही बातमी शेअर करताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जून महिन्यात आफताबने लग्नाच्या सहाव्या वाढदिवशी पत्नीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. आफताब व नीन यांनी 5 जून 2014 रोजी लग्न केले होते. कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा झाला होता. यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये या कपलने श्रीलंकेत पुन्हा दुस-यांदा लग्न केले होते.

2014 मध्ये मध्ये आफताब व नीन यांनी कोर्ट मॅरेज केले होते. 2017 मध्ये त्यांनी विधीवत लग्न केले होते. सोशल साईटवर आफताब व नीनच्या या रॉयल लग्नाचे फोटो   व्हायरल झाले होते. 

आफताबची पत्नी नीन ही अभिनेता कबीर बेदीची साळी आहे. कबीरने नीनची बहीण परवीन दुसांजसोबत लग्न केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आफताब सध्या ‘पॉइजन 2’ या वेबसीरिजमध्ये बिझी आहे. मिस्टर इंडिया, शेहंशाह, चालबाज यासारख्या चित्रपटांत बाल कलाकार म्हणून आफताब दिसला. 1999 मध्ये  मस्त या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केले. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर त्याची हिरोईन होती. यानंतर आफताबने बरेच चित्रपट केलेत. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood actor aftab shivdasani nin dusanj became parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.