आमिर खानच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार किती?; एखाद्या CEO इतकं मिळतं वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:07 PM2021-09-15T19:07:39+5:302021-09-15T19:10:09+5:30

अभिनेता आमिर खानच्या बॉडीगार्डला मिळतो भरभक्कम पगार

bollywood aamir khan bodyguard yearly salary 2 crore is no less than a company ceo | आमिर खानच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार किती?; एखाद्या CEO इतकं मिळतं वेतन

आमिर खानच्या मराठमोळ्या बॉडीगार्डचा पगार किती?; एखाद्या CEO इतकं मिळतं वेतन

Next

मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. भारतातच नव्हे, तर जगभरात आमिरचे चाहते आहेत. आमिरची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. अनेकदा अतिउत्साही चाहत्यांमुळे सेलिब्रिटी अडचणीत येतात. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी सुरक्षा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. सेलिब्रिटींच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या बॉडीगार्ड्सवर मोठी जबाबदारी असते. 

आमिर खानच्या सुरक्षेची जबाबदारी एका मराठमोळ्या व्यक्तीवर आहे. त्याचं नाव युवराज घोरपडे. चित्रपटाचं प्रमोशन असो वा सार्वजनिक ठिकाणं, युवराज प्रत्येक ठिकाणी आमिर खान यांच्यासोबत असतो. आमिर खानच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. आमिर येणार असल्याची, आल्याची माहिती मिळताच चाहत्यांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे आमिरची सुरक्षा महत्त्वाची ठरते. युवराज देत असलेल्या सेवेबद्दल आमिर त्याला भरभक्कम पगार देतो. 

युवराज घोरपडेंचा पगार एखाद्या कंपनीच्या सीईओइतका आहे. युवराजला वर्षाकाठी २ कोटी रुपये इतका पगार मिळतो. युवराजला बॉडी बिल्डर व्हायचं होतं. मात्र त्याला आमिरसोबत काम करण्याची संधी मिळाली. १६ व्या वर्षी शिक्षण सोडणाऱ्या युवराजनं एका सुरक्षा कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला आमिरची सुरक्षा करणाऱ्या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: bollywood aamir khan bodyguard yearly salary 2 crore is no less than a company ceo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app