सोशल मीडियावर चित्रपटसृष्टीतील सगळेच कलाकार खूप अॅक्टीव्ह असतात. त्यामुळे सतत त्यांची चर्चा रंगलेली असते. त्याचपाठोठ अभिनेत्यांच्या पत्नींचीही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. सतत सोशल मीडियावर अपडेट शेअर करत असल्यामुळे ''हम भी किसीसे कम नही'' असेच चित्र सध्या पाहायला मिळतंय. यात शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सध्या चर्चेत आहे. हातात कोणत्याही प्रकारचे काम नसतातना मीरा शाहिदपेक्षा जास्त चर्चेत असते.

शाहिदकपूरची पत्नी मीरा राजपूतवर दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. त्यावर ते भरभरून लाइक्स आणि कमेंट्स देतात.

 


सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला मीराची एक से बढकर एक स्टायलिश फोटो पाहायला मिळतील. लग्नानंतर झालेला बदल मीराच्या या फोटोंमध्ये पाहायला मिळतोय. मध्यंतरी मीरा आणि शाहिद कपूर 'नच बलिये' शोला जज करणार असल्याच्याही बातम्या आल्या होत्या.

 

मात्र काही कारणामुळे मीराचे ऑनस्क्रीन झळकण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले होते. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये आपणही नशीब आजमवावे असे स्वप्न शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपुत पाहू लागली आहे. 

सोशल मीडियावर ती सतत तिच्या अपडेट शेअर करत सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. पहिल्यांदाच मीरा राजपूतने तिचा बोल्ड फोटो शेअर केला आणि सा-यांनाच आश्चर्यचकीत केले. कारण या फोटोंमुळे मीरादेखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार की काय ?अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

या चर्चांना तिचा हाच फोटो सध्या कारणीभूत ठरला आहे. मध्यंतरी देखील तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र या केवळ चर्चाच ठरल्या. चांगली संधी मिळाली तर मीरा राजपुतही रूपेरी पडद्यावर झळकणार असे तिने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते.

 

तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही तिच्या फॉलोव्हर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होत आहे.  वर्कआऊट करतानाचे व्हिडीओसुद्धा ती सोशल मीडियावर शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून मीरा आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bold photos of Shahid Kapoor's wife Meera Rajput caught the attention Of Fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.