हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे आमिषा पटेल.

‘कहो ना प्यार है’ या सिनेमाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. या सिनेमातील तिची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती. त्यानंतर तिने 'गदर', 'हमराज' यांसारख्या सिनेमांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण त्यानंतर तिचे सगळेच सिनेमे फ्लॉप झाले. करिअरला सुरुवात केली त्यावेळी अमिषाने ‘सिलेक्टीव्ह’ होण्याऐवजी एकापाठोपाठ एक डझनभर सिनेमे साईन केलेत. 

यातले बहुतेक सिनेमे आपटले आणि अमिषाच्या करिअरची नौका डळमळू लागली. या झटक्यातून सावरायला तिला तीन वर्षं लागली. 2006 मध्ये अब्बास मस्तानच्या ‘हमराज’ने तिच्या करिअरला काहीसा आधार दिला. पण तोपर्यंत अमिषाचे स्टारडम संपले होते. 2018 साली ‘भैयाजी सुपरहिट’ हा तिचा सिनेमा रिलीज झाला. पण हा सिनेमाही दणकून आपटला.

गेल्या काही वर्षांपासून अमीषा कोणत्याही सिनेमात झळकलेली नाही. कामच मिळत नसल्याने ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. तरीदेखील ती नेहमी तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट करत सा-यांचे लक्ष वेधून घेण्याचाही प्रयत्न करते.चुलबुली दिसणारी अमिषाने आता वयाची 45 गाठली आहे.

रुपेरी पडद्यावर आमिषाची जादू चालली नसली तरी तिचे बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र घायाळ होत असतात. पूर्वीपेक्षा ती आता जरा जास्तच बोल्ड झाल्याचे पाहायला मिळते.

 

 

 

तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.  हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती धुमाकुळ घालत असते.इंस्टाग्रामवर अमिषाचे 37 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: BOLD PHOTO OF Ameesha Patel Who caught Everyone's Attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.