बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पण यापेक्षाही तिचे फोटो आणि व्हिडीओमुळेच ती जास्त चर्चेत असते. तिच्या फिटनेसचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. नुकतीच तिने फिल्म फेअर ग्लॅमर अँड स्टाईल पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिने परिधान केलेल्या मिरर ड्रेसमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फिल्म फेअर ग्लॅमर अँड स्टाईल पुरस्कार सोहळ्यातील लूकचे फोटो मलायका अरोराने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या मिरर गाऊन व त्यावर लाईट मेकअपमधील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे.


मलायका सतत काहीना काही कारणाने चर्चेत असते. परवा तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती एक कठिण योग करताना दिसत होती.


विशेष म्हणजे मलायकाच्या या व्हिडीओवर अर्जुन कपूरचा काका अभिनेता संजय कपूरनं कमेंट केली होती. यशिवाय फराह खाननं सुद्धा मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट केली होती.


मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही.

सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. तिचे हे फोटो त्याचा पुरावा आहेत.

Web Title: Bold and Hot Adorable Malaika Arora Appears in Mirror Dress Stunning!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.