बॉलिवूडची डिम्पल गर्ल प्रिती झिंटा गेल्या काहीकाळापासून लाइम लाइटपासून दूर आहे. जेव्हापासून तिने तिचा लंडन बेस्ट बॉयफ्रेंड जीन गुडएनफ याच्याशी लग्न केले तेव्हापासून ती एकाही चित्रपटात झळकली नाही. शिवाय ती प्रसिद्धीपासून दूर आहे. अशात प्रितीची एक झलक बघण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले नसतील तरच नवल. पण आज आम्ही तुम्हाला प्रितीची झलक दाखविणार आहोत. होय, नुकतेच प्रितीचे असे काही फोटोज् समोर आले जे बघून तिचे चाहते खूश झाल्याशिवाय राहणार नाहीत. होय, प्रितीचे सोशल मीडियावर जे फोटो व्हायरल होत आहेत, त्यामध्ये ती बेबी बंम्प लपविताना दिसत आहे. फोटोवरून हे स्पष्ट होत आहे की, ती गर्भवती आहे. या फोटोमध्ये प्रितीने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला आहे. त्याचबरोबर काळ्या रंगाच्या स्कार्फने ती बेबी बंम्प लपविताना दिसत आहे. मात्र ती गर्भवती असल्याच्या बातमीला अद्यापपर्यंत दुजोरा मिळाला नसल्याने यावर काहीही बोलणे घाईचे ठरेल. कारण प्रितीप्रमाणे हॉट अभिनेत्री बिपाशा बसू हिच्याबद्दलही काहीशा अशाच चर्चा समोर आल्या होत्या. परंतु तिने ट्विट करून या अफवा असल्याचे सांगत तिने चर्चांना पूर्णविराम दिला. 

प्रितीने जीनसोबत २० फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजेल्स येथे लग्न केले होते. या दोघांची पहिली भेट सांता मोनिका येथे झाली होती. त्यानंतर दोघांनी तब्बल पाच वर्षे एकमेकांना डेट केले. आता प्रिती तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणार असून, यानिमित्त ती तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रितीने १९९८ मध्ये ‘दिल से’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे बॉबी देओलसोबत तिला ‘सोल्जर’ या चित्रपटातून खºया अर्थाने ओळख मिळाली. प्रिती अखेरीस २००८ मध्ये आलेल्या ‘हॅवेन आॅन अर्थ’मध्ये बघावयास मिळाली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bobby Deol's 'actress' will see photos of her fans, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.