कॉल सेंटरमध्ये काम करायची बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, भाईजानने बनवलं तिला हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 12:43 PM2021-05-14T12:43:35+5:302021-05-14T12:52:17+5:30

सलमान आणि तिच्या अफेअरच्या चर्चांनादेखील उधाण आले होते.

Birthday special zareen khan wanted to become an air hostess salman khan changed her life | कॉल सेंटरमध्ये काम करायची बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, भाईजानने बनवलं तिला हिरोईन

कॉल सेंटरमध्ये काम करायची बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, भाईजानने बनवलं तिला हिरोईन

Next

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानचा आज वाढदिवस 34 वा वाढदिवस साजरा करित आहे. जरीनने 'वीर' सिनेमातून कारकिर्दीला सुरुवात केली. तिच्या पहिल्या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण तिला बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. कॅटरिना कैफसारखी जरीन दिसते म्हणून जरीनला ‘वीर’ चित्रपट मिळाला होता असे त्या काळात म्हटले गेले होते. एवढेच नव्हे तर या चित्रपटाच्यावेळी सलमान आणि जरीन यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. सलमान अनेक समारंभात, पार्टीत जरीनसोबत उपस्थिती लावत असे. पण काहीच दिवसांत या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. सलमाननेच जरीनला बॉलिवूडमध्ये सेटल व्हायला मदत केली.


जरीन खानचा जन्म सन 1987 मध्ये मुंबईत येथे झाला होता. 12 वीत असताना जरीनच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी जरीनच्या खांद्यावर आली. जरीनला डॉक्टर व्हायचं होतं. पण वडील घरातून निघून गेल्यामुळे आर्थिक परिस्थिती खालावली होती, म्हणून जरीनला तिचा अभ्यास  सोडून कामाच्या शोधात जावं लागलं. त्यावेळी तिचं वजन 100 किलो होते, त्यामुळे तिला काम मिळताना अडचणी येत होत्या. कशीबशी तिला कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली, कॉल सेंटरमध्ये नोकरी करताकरता जरीन वजन कमी करण्यास सुरुवात केली.

जेव्हा जरीनचे कामात मन लागत नव्हते तेव्हा तिने एअर होस्टेस होण्याचे ठरवले. त्याने सर्व राऊंड क्लिअर केले. याच दरम्यान तिची ओळख सलमान खानशी झाली.  सलमान खान त्याच्या 'युवराज' चित्रपटाचे शूटिंग करत होता. यावेळी त्याची नजर जरीन खानवर पडली. त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी सलमानच्या टीमने जरीन खानशी संपर्क साधला.  जरीन खानला इतक्या मोठ्या स्टारची ऑफर नाकारता आली नाही आणि तिने चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. 


जरीनने वीर या चित्रपटानंतर हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ या चित्रपटांमध्ये काम केले. पण जरीनला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. जरीन लवकरच हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटासाठी ती चांगलीच मेहनत घेत आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday special zareen khan wanted to become an air hostess salman khan changed her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app