Weird! ‘बेबीडॉल’ सनी लिओनीला आहे ही विचित्र सवय, दर 15 मिनिटाला करते हे काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:41 PM2021-05-13T19:41:58+5:302021-05-13T19:44:46+5:30

याला सवय म्हणा वा आजार...! सनीचा भूतकाळ, तिचे कुटुंब,तिचा प्रवास याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सनीच्या एका सवयीविषयी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

birthday special Sunny Leone Cannot Stop herself from Washing feet every 15 Minutes | Weird! ‘बेबीडॉल’ सनी लिओनीला आहे ही विचित्र सवय, दर 15 मिनिटाला करते हे काम!!

Weird! ‘बेबीडॉल’ सनी लिओनीला आहे ही विचित्र सवय, दर 15 मिनिटाला करते हे काम!!

Next
ठळक मुद्देआजघडीला सनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार सनीकडे 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. स्वत:चे रोज नवे व्हिडीओ, फोटो ती शेअर करत असते.  तिच्या सिनेमांची आणि प्रोजेक्टची जेवढी चर्चा होते तेवढीच  तिच्या खासगी आयुष्याविषयी होते. याचमुळे गुगल सर्चमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणा-या अभिनेत्रींमध्ये सनीचे नाव आहे.
सनीचा भूतकाळ, तिचे कुटुंब,तिचा प्रवास याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण सनीच्या एका सवयीविषयी कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. याला सवय म्हणा वा आजार. पण सनी दर 15 मिनिटांनी हे काम करते.

तिची ही विचित्र सवय कळली तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास  बसला नाही. पण ‘जिस्म 2’च्या शूटींगदरम्यान सनी लिओनीने हा खुलासा केला होता. या विचित्र सवयीमुळे सनीला अनेकदा शूटींगसाठी उशीर होतो. आता ही विचित्र सवय कुठली तर सनी दर 15 मिनिटांनी पाय धुते. पाय धुतल्याशिवाय तिला चैन पडत नाही.

काहींना मिनिटामिनिटाला हात धुण्याची सवय असते. तसेच सनीला दर 15 मिनिटांला पाय धुण्याची सवय आहे. या सवयीच्या ती एवढी आहारी गेलीय की, याच कारणामुळे तिला सेटवर पोहोचायला उशीर होतो.
सनीने ‘जिस्म 2’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘बिग बॉस’च्या 5 व्या  सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खºया अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

आजघडीला सनी कोट्यावधीची मालकीण आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार सनीकडे 97 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचे वार्षिक उत्पन्न 2 कोटींच्या घरात आहे. याशिवाय  अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. मुंबईतील तिच्या बंगल्याची किंमत जवळपास 3 कोटींच्या घरात आहे. याशिवाय अमेरिकेतही तिचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 30 कोटी आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special Sunny Leone Cannot Stop herself from Washing feet every 15 Minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app