ठळक मुद्दे​​​​​​​‘कमीने’ या सिनेमाचे शूटींग सुरु असतानाच शाहिदचे नाव टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतही जोडले गेले.

शाहिद कपूर आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करतोय. 2015 मध्ये शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. पण त्याआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. यापैकी एका अभिनेत्रीसोबत तर शाहिद लग्नही करणार होता. पण त्याआधीच ब्रेकअप झाले. आज शाहिदच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आयुष्यात आलेल्या महिलांबद्दल आम्ही सांगणार आहोत...

करिना कपूर

करिना कपूर अर्थात बेबो ही शाहिदच्या आयुष्यात आलेली पहिली अभिनेत्री. या रिलेशनशिपबद्दल सगळेच जाणतात. ‘फिदा’च्या सेटवर करिना व शाहिदची भेट झाली होती आणि याच सिनेमाच्या सेटवर दोघांत प्रेम फुलले होते. करिना व शाहिद कपूर लग्नही करणार होते. पण त्याआधीच ‘जब वी मेट’च्या सेटवर दोघांचे ब्रेकअप झाले होते.

प्रियंका चोप्रा

करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदचे नाव अनेकींशी जोडले गेले. या अनेकींपैकीच एक होती प्रियंका चोप्रा. प्रियंका व शाहिदच्या अफेअरच्या नको इतक्या गाजल्या. प्रियंका व शाहिद यांनी ‘कमीने’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ यासारख्या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये ‘कमीने’च्या शूटींगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. ‘कमीने’हिट झाला आणि पाठोपाठ शाहिद व प्रियंकाची जोडीही हिट झाली. याचदरम्यान अशी एक घटना घडली की, या दोघांच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले. होय, प्रियंका व शाहिदच्या प्रेमाच्या चर्चा सुरु असतानाची ही घटना. झाले असे की, या चर्चा सुरु असतानाच प्रियंकाच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. 25 जानेवारी2011 रोजी आयकर विभागाचे कर्मचारी प्रियंकाच्या घरी पोहोचले तेव्हा सकाळचे 7.30 वाजले होते. कर्मचा-यांनी प्रियंकाच्या घराची दरवाजा ठोठावला. ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यावेळी शाहिदने प्रियंकांच्या घराचा दरवाजा उघडला होता. शाहिद कपूर टॉवेलमध्ये होता. ही बातमी कानोकानी झाली आणि शाहिद व प्रियंकांच्या अफेअरच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले.
त्याकाळात प्रियंका व शाहिद यांनी गोव्यात एका प्रायव्हेट पार्टीत साखरपुडा केल्याचीही चर्चा होती. साहजिकच दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सुरु झाल्या होत्या. पण याचदरम्यान प्रियंका ‘अंजाना अंजानी’या चित्रपटात बिझी झाली. यात रणबीर कपूर तिचा हिरो होता. काहीच दिवसांत प्रियंका व रणबीरच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आणि पाठोपाठ शाहिद व प्रियंकाची लव्हस्टोरी संपल्याचीही बातमी आली. 

अमृता राव

शाहिद कपूरने ‘इश्क विश्क’ या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात त्याची हिरोईन होती अमृता राव. यानंतर अमृतासोबत शाहिदने आणखी काही सिनेमात काम केले. खरे तर यावेळी शाहिद करिनासोबत नात्यात होता. पण का कुणास ठाऊक, असे असतानाही शाहिद व अमृताच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पुढे अनेक वर्षांनी अमृताने या चर्चेवर खुलासा केला होता. अमृता रावनुसार, जेव्हा शाहिद कपूर आणि माझ्याबद्दल अफवा सुरू होत्या त्यावेळी आम्ही दोघे चांगले फ्रेंड्सदेखील नव्हतो. आम्ही दोघे एकमेकांना फक्त ओळखत होतो. याशिवाय आमच्यात काहीच नव्हते. आम्ही दोघे आजही एकमेकांचा खूप आदर करतो. जेव्हा मी शाहिदसोबत चित्रपटात काम करत होते तेव्हा तो एका नात्यात होता.

विद्या बालन

शाहिद कपूर व विद्या बालन यांनी ‘किस्मत कनेक्शन’ या सिनेमात एकत्र काम केले. याच सिनेमादरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते, असे मानले जाते. मात्र काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. या बे्रकअपचे कारण अद्यापही कोणालाही ठाऊक नाही.

सानिया मिर्झा


 

‘कमीने’ या सिनेमाचे शूटींग सुरु असतानाच शाहिदचे नाव टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतही जोडले गेले. सानिया अगदी रोज शाहिदला भेटण्यासाठी ‘कमीने’च्या सेटवर जायची. व्हॅनिटीमध्ये दोघेही तासन्तास वेळ घालवायचे. पण याचदरम्यान अचानक सानिया मिर्झा एका तेलगू अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आणि शाहिद व सानियाच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम लागला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special shahid kapoors love affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.