ठळक मुद्देसमीराने 2002 मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून डेब्यू केला होता.

 एकेकाळी बॉलिवूडची हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी समीरा रेड्डी हिचा आज वाढदिवस. समीरा सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. आताश: ती दिसते ती केवळ सोशल मीडियावर. ग्लॅमरस, बोल्ड, हॉट अदांमुळे काही काळ ती चर्चेत आली. पण फिल्मी करिअरमध्ये मात्र याचा तिला फार लाभ झाला नाही. बोटावर मोजता येण्यासारखे एक-दोन सुपरहिट सिनेमे नावावर असूनही इंडस्ट्रीत ती जागा निर्माण करू शकली नाही. यानंतर तिने लग्न केले आणि संसारात रमली. आज समीरा दोन मुलांची आई आहे. 

  फिल्म इंडस्ट्रीत समीरा ग्लॅमरस, बोल्ड हिरोईन म्हणून वावरली. पण यासाठी तिने फार मोठी किंमत चुकवली. तिचे अख्खे बालपण कोमजले. विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. खुद्द समीराने एका पोस्टमध्ये याबद्दल लिहिले होते.

शालेय जीवनात समीरा धिप्पाड होती. सोबत तिचे वजनही जास्त होते. तिला बघून लोकांच्या चेह-यावरचे भाव बदलायचे आणि समीरा ते भाव अगदी अलगद टिपायची. याचा परिणाम म्हणजे, समीराने वजन घटवण्याचा चंग बांधला. वजन घटवण्याच्या नादात तिने अख्खे शालेय जीवन घालवले. ‘कुणीतरी मला स्वत:वर प्रेम करायला शिकवायला हवे होते. लोक मला स्वीकारतील की नाही या चिंतेत आणि वजन घटवण्यात मी शालेय जीवनातील अनेक वर्षे घालवली,’ अशी भावूक पोस्ट समीराने मध्यंतरी लिहिली होती, ती त्याचमुळे. 

समीराने 2002 मध्ये ‘मैंने दिल तुझको दिया’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. पण तिचा हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. यानंतर 2004 मध्ये आलेल्या ‘मुसाफिर’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली.

हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर नो एन्ट्री, टॅक्सी नंबर 9211 अशा चित्रपटात ती झळकली. पण पुढे यश हुलकावणी देत राहिले आणि अखेर समीराने बॉलिवूड सोडून लग्न करण्याचा निर्णय घेतला.
 

Web Title: Birthday Special: sameera reddy unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.