ठळक मुद्देत्याकाळात प्रियंका व शाहिद यांनी गोव्यात एका प्रायव्हेट पार्टीत साखरपुडा केल्याचीही चर्चा होती.

शाहिद कपूर आणि करिना कपूर यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण एकेकाळी शाहिद-करिना इतक्याच शाहिद कपूर आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्या प्रेमाच्या बातम्याही सगळ्यांच्या ओठांवर होत्या. रिल लाईफमध्येच नाही तर रिअल लाईफमध्येही या जोडीला एकत्र पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते. पण अचानक रिअल लाईफमध्ये या जोडीचे ब्रेकअप झाले आणि चाहत्यांची निराशा झाली. आज शाहिद कपूरचा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्रियंका व शाहिदची लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत.

करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदच्या आयुष्यात प्रियंकाची एन्ट्री झाली होती.  2007 मध्ये ‘जब वी मेट’च्या शूटिंग दरम्यान करिना आणि शाहिद यांच्या नात्यात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. अखेर करिना व शाहिद कायमचे दूर झाले. करिना कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर शाहिदचे नाव अनेकींशी जोडले गेले. या अनेकींपैकीच एक होती प्रियंका चोप्रा. प्रियंका व शाहिदच्या अफेअरच्या नको इतक्या गाजल्या.

प्रियंका व शाहिद यांनी ‘कमीने’ आणि ‘तेरी मेरी कहानी’ यासारख्या चित्रपटात काम केले. 2009 मध्ये ‘कमीने’च्या शूटींगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. ‘कमीने’ हिट झाला आणि पाठोपाठ शाहिद व प्रियंकाची जोडीही हिट झाली. इतकेच नाही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या लोकप्रिय शोमध्येही ही जोडी एकत्र दिसली. यानंतर अनेक ठिकाणी ही जोडी एकत्र दिसली. साहजिकच दोघांच्या अफेअरचया चर्चांना बळ मिळाले. याचदरम्यान अशी एक घटना घडली की, या दोघांच्या अफेअरवर शिक्कामोर्तब झाले.

होय, प्रियंका व शाहिदच्या प्रेमाच्या चर्चा सुरु असतानाची ही घटना. झाले असे की, या चर्चा सुरु असतानाच प्रियंकाच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडली. 25 जानेवारी2011 रोजी आयकर विभागाचे कर्मचारी प्रियंकाच्या घरी पोहोचले तेव्हा सकाळचे 7.30 वाजले होते. कर्मचाºयांनी प्रियंकाच्या घराची दरवाजा ठोठावला. ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यावेळी शाहिदने प्रियंकांच्या घराचा दरवाजा उघडला होता. शाहिद कपूर टॉवेलमध्ये होता. ही बातमी कानोकानी झाली आणि शाहिद व प्रियंकांच्या अफेअरच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब झाले.

पुढे याबद्दल प्रियंकाने खुलासाही केला होता. आयकर विभागाची धाड पडली तेव्हा शाहिद कपूर माझ्या घरीच होता, अशी कबुली खुद्द प्रियंकाने दिली होती. शाहिद माझ्या घरापासून 3 मिनिटांच्या अंतरावर राहतो. त्यामुळे धाड पडली तेव्हा मी शाहिदला फोन केला आणि तो लगेच आला, असे ती म्हणाली होती.

त्याकाळात प्रियंका व शाहिद यांनी गोव्यात एका प्रायव्हेट पार्टीत साखरपुडा केल्याचीही चर्चा होती. साहजिकच दोघांच्या लग्नाच्या बातम्याही सुरु झाल्या होत्या. पण याचदरम्यान प्रियंका ‘अंजाना अंजानी’ या चित्रपटात बिझी झाली. यात रणबीर कपूर तिचा हिरो होता. काहीच दिवसांत प्रियंका व रणबीरच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या आणि पाठोपाठ शाहिद व प्रियंकाची लव्हस्टोरी संपल्याचीही बातमी आली. चर्चा खरी मानाल तर शाहिदने प्रियंकाला रणबीरसोबत काम करण्यास मनाई केली होती. पण प्रियंका काही ऐकायला तयार नव्हती. नेमक्या याच कारणावरून प्रियंका व शाहिद यांच्या दुरावा आल्याचे मानले जाते. काहींच्या मते, प्रियंका व शाहिदची लाईफस्टाईल एकमेकांपेक्षा एकदम भिन्न होती. शाहिदला घरी राहायला आवडायचे तर प्रियंकाला पार्ट्यां आवडायच्या.

Web Title: Birthday Special : reason behind shahid kapoor and priyanka chopra breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.