हॉलिवूड सिंगर, गायक व प्रियंका चोप्रा हिचा नवरा निक जोनस आज त्याचा २७ वा वाढदिवस साजरा करतो आहे. निक जोनासप्रियंका चोप्रा डिसेंबर, २०१८मध्ये लग्नबेडीत अडकले. प्रियंका चोप्रा हल्ली चित्रपटांपेक्षा तिचा नवरा निक जोनासमुळे जास्त चर्चेत असते. निक आणि प्रियांका यांच्या वयात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. निक २६ वर्षांचा तर प्रियांका ३७ वर्षांची आहे. निकपूर्वी प्रियांकाचं नाव असीम मर्चंट, अक्षय कुमार, हरमन बावेजा आणि शाहिद कपूरसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकाप्रमाणेच निकच्या आयुष्यातही यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ सेलिब्रेटींसोबत निकचं अफेअर होतं.
 
मिली सायरस निकची पहिली गर्लफ्रेंड होती. तेव्हा निक फक्त तेरा वर्षांचा होता. निक आणि मिलीने २००६ मध्ये एकमेकांना डेट करणे सुरु केले होते. दोघं पहिल्यांदा चॅरिटी इव्हेंटमध्ये भेटले होते.


मिलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर २००८ मध्ये निक सेलेना गोमेजच्या प्रेमात पडला. परंतू दोघांचे नाते जास्त काळ टिकले नाही. काही महिन्यांनंतरच २००९ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.


निकने फेब्रुवारी २०१२ मध्ये डेल्टा गुड्रमला डेट करत होता आणि तिच्यासोबतही ब्रेकअप झालं.

ओलिविया कल्पोसोबत निक जास्त वेळ रिलेशनशीपमध्ये होता. २०१३ मध्ये त्यांचं नातं सुरु झालं आणि तर २ वर्षांनंतर २०१५ मध्ये ते वेगळे झाले. 

एका न्यूज पोर्टलच्या सुत्रांनुसार निक आणि केंडाल जेफरने २०१५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरूवात केली होती.


वयापेक्षा मोठ्या मुलीला डेट करण्याची निकची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१५ मध्ये त्याने आपल्यापेक्षा १४ वर्षे मोठ्या केट हडसनला डेट केलं होतं.


युएस वीकलीच्या रिपोर्टनुसार २०१६ मध्ये निक आणि लिली कोलिन्स एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचे नाते वर्षभरही टिकू शकले नाही.


जॉर्जिया फॉलरला २०१७ साली निक डेट करत असल्याची चर्चा होती.


Web Title: Birthday Special: Priyanka Chopra's husband Nick Jonas had 8 girlfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.