Birthday Special : तो ‘बोल्ड’ निर्णय घेणा-या नीना गुप्ता आजही आहेत तितक्याच ‘बोल्ड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 08:00 AM2019-07-04T08:00:00+5:302019-07-04T08:00:03+5:30

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्तांचा आज (4 जुलै) वाढदिवस. 4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले.

Birthday Special : neena gupta reveals how her blunt nature and lifestyle destroyed her filmy career | Birthday Special : तो ‘बोल्ड’ निर्णय घेणा-या नीना गुप्ता आजही आहेत तितक्याच ‘बोल्ड’!

Birthday Special : तो ‘बोल्ड’ निर्णय घेणा-या नीना गुप्ता आजही आहेत तितक्याच ‘बोल्ड’!

googlenewsNext
ठळक मुद्दे लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली.

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्तांचा आज (4 जुलै) वाढदिवस. 4 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या नीना यांनी ‘खानदान’ या टीव्ही मालिकेद्वार फिल्मी करिअर सुरू केले. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. पण त्यांची सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या एका ‘बोल्ड’ निर्णयाने. 8० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली. यासाठी त्यांना पराकोटीच्या टीकेला सामोरे जावे लागले. पण स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा.

8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. आजही नीना तितक्याच बोल्ड आहेत. साठी ओलांडल्यानंतरही स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस त्यांच्यात आहेत. माझ्या बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या.

  ‘माझ्या बंडखोरीने माझे करिअर उद्धवस्त केले’
‘माझ्या बंडखोरीने माझे करिअर उद्धवस्त केले’, हे खुद्द नीना यांचे शब्द आहेत. एका मुलाखतीत त्या बोलल्या होत्या. इंडस्ट्रीत तुमची पर्सनॅलिटी पाहून तुम्हाला भूमिका दिल्या जातात. मी एक बंडखोर महिला होते. यामुळे मला सतत निगेटीव्ह भूमिका दिल्या. पहिल्या कमर्शिअल फिल्ममध्ये मी बबली गर्ल साकारली होती. यानंतर मला तसेच रोल ऑफर केले गेलेत. चोली के पीछे है क्या...या गाण्यानंतरही मला तशाच गाण्यांची ऑफर आली. पण टीव्हीने मला वाचवले. त्याकाळात टीव्हीचा आधार मिळाला नसता तर मला माघारी परतावे लागले असते,’ असे त्या म्हणाल्या होत्या.

नीना यांनी स्वत:ला बंडखोर म्हणले, याचे कारण म्हणजे, त्यांचा कुमारी माता बनण्याचा एक बंडखोर निर्णय.  निर्णयानंतर नीनांना लीड अ‍ॅक्ट्रेस म्हणून घेण्यास दिग्दर्शक निर्माते कचरू लागले होते. निगेटीव्ह रोल आणि छोट्या भूमिका त्यांना ऑफर होऊ लागल्या होत्या.

सगळ्यांनी केले होते दूर
वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होता. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियनने. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. पण असे असूनही दोघांचे प्रेम बहरले. इतके की, केवळ भारतातचं नाही तर इंटरनॅशनल मीडियातही या प्रेमप्रकरणाची चर्चा झाली. विवियन नीनाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. पण त्याला आपले लग्नही तोडायचे नव्हते. त्यामुळे त्याने नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला. पण प्रेमाचे पाश तोडणे मात्र त्याला जमले नाही. याच प्रेमाचे प्रतिक म्हणजे, नीना व विवियन यांची मुलगी मसाबा. लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.


1989 मध्ये नीना यांनी मुलीला जन्म दिला. कुमारी माता बनण्याच्या नीनांच्या या निर्णयावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. पण नीना डगमगल्या नाहीत. नीनाने सिंगल पॅरेंट बनून मसाबाचे संगोपन केले. कारण मसाबाच्या जन्मानंतर विवियन व नीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. हळूहळू दोघांच्या भेटी कमी झाल्यात. त्यांच्यात दुरावा आला. पुढे दोघांनीही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अर्थात विवियनने नीनांसोबत संबंध तोडले तरी पित्याचे कर्तव्य मात्र निभवले. विवियनकडून एकार्थाने धोका मिळाल्यानंतर नीना यांनी एकटीच्या बळावर मसाबाला घडवले. आज मसाबा बॉलिवूडची नामवंत फॅशन डिझाईनर म्हणून ओळखली जाते.

Web Title: Birthday Special : neena gupta reveals how her blunt nature and lifestyle destroyed her filmy career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.