बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन आपल्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. कोंकणा आज ४१ वा वाढदिवस साजरा करते आहे. अशात आज तिच्या अशा काही निर्णयाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तिची प्रतिमा बदलून गेली होती.


कोंकणा सेनने आपल्या करिअरची सुरूवात एक बालकलाकार म्हणून केली होती. तिने १९८३ साली बंगाली चित्रपट इंदिरामधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. मोठी झाल्यावर कोंकणाने बंगाली चित्रपट एक जे आछे कन्यामधून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. यातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. २००२ साली ऋतुपर्णो घोष यांचा चित्रपट तितलीमध्ये कोंकणा झळकली आणि अभिनयातून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.


कोंकणा सेनच्या लव्ह लाइफबद्दल सांगायचं तर आजा नच ले चित्रपटाच्या सेटवर अभिनेता रणवीर शौरीसोबत कोंकणाची भेट झाली. या सेटवर त्या दोघांमध्ये प्रेम फुलले आणि त्यांच्या अफेअरची चर्चादेखील चांगली रंगली होती. 


रणवीर शौरीसोबत रिलेशनशीपमध्ये असताना कोंकणा प्रेग्नेंट राहिली. मग त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि २०१० साली ते दोघे विवाहबंधनात अडकले. त्याच्या काही महिन्यांनंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला. या मुलाचे नाव हारून आहे. मात्र कोंकणा आणि रणवीरचे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही.


काही वर्षांनंतर कोंकणाने पुन्हा एकदा आपल्या बोल्ड निर्णयाने सर्वांना हैराण केले. २०१५ साली कोंकणाने रणवीर शौरीसोबत वेगळे होत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले. तिचा हा निर्णय ऐकून चाहते हैराण झाले.


वेगळे झाल्यानंतर पाच वर्षांनंतर नुकतेच दोघांचा घटस्फोट झाला. दोघांचा ऑगस्टमध्ये घटस्फोट झाला. मुलाची कस्टडी कोंकणाकडे देण्यात आली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special: Konkona Sen is known for her bold decisions. She was pregnant before marriage and then divorced her husband.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.