Birthday Special : जाणून घ्या जयाप्रदा यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 06:00 AM2019-04-03T06:00:00+5:302019-04-03T06:00:02+5:30

आज (३ एप्रिल) जयाप्रदा यांचा वाढदिवस. त्याच निमित्ताने जाणून घेऊ या, जयाप्रदा यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी...

Birthday Special: know some lesser known facts about jayaprada life | Birthday Special : जाणून घ्या जयाप्रदा यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी!!

Birthday Special : जाणून घ्या जयाप्रदा यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे१९८६ मध्ये फिल्मी करिअर अत्त्युच्च शिखरावर असताना जयाप्रदा यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला. तेही तीन मुलांचा बाप असलेल्या निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी.

सिने अभिनेत्री व  माजी खासदार जयाप्रदा यांनी नुकताच भाजपाचा झेंडा हाती घेतला.  उत्तर प्रदेशातील रामपूर येथून लोकसभा निवडणूक लढणाºया जयाप्रदा सध्या प्रचारात व्यस्त आहेत. याच जयाप्रदा एकेकाळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस शान होत्या. बॉलिवूड अभिनेत्री या नात्याने आजही चाहते त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सूक असतात ते म्हणूनच. आज (३ एप्रिल) जयाप्रदा यांचा वाढदिवस. त्याच निमित्ताने जाणून घेऊ या, जयाप्रदा यांच्याबद्दलच्या काही खास रोचक गोष्टी...

अभिनेत्री जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी आहे. चित्रपटांत आल्यानंतर त्यांनी जयाप्रदा हे नाव धारण केले. ३ एप्रिल १९६२ रोजी आंध्रातील राजाहमुंडरी येथे त्यांचा जन्म झाला.

जयाप्रदा यांचे वडील कृष्णा राव हे तेलगू चित्रपटांचे फायनान्सर होते. जयाप्रदा यांनी तेलगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘भूमिकोसम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रूपये मानधन मिळाले होते.

सुरुवातीपासूनच जयाप्रदा यांचे आयुष्य रहस्यांनी भरलेले राहिले.   १९८६ मध्ये जयाप्रदा यांचे फिल्मी करिअर अत्त्युच्च शिखरावर असताना त्यांनी अचानक लग्नाचा निर्णय घेतला. तेही तीन मुलांचा बाप असलेल्या निर्माता श्रीकांत नाहटा यांच्याशी.  ८० च्या दशकात जयाप्रदा आघाडीच्या अभिनेत्री होत्या. पण याचदरम्यान त्यांच्या घरी इनकम टॅक्सची रेड पडली. हा त्यांच्या आयुष्यातील सगळ्यांत वाईट काळ होता. रेड पडल्यानंतर जयाप्रदा यांच्या करिअरचा ग्राफ अचानक खाली आला. याकाळात श्रीकांत नाहटा यांनी जयाप्रदांना साथ दिली. यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम. पण श्रीकांत नाहटा आधीच विवाहित होते. पण जयाप्रदा नाहटांच्या प्रेमात जणू वेड्या होत्या. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता अखेर नाहटांनी जयाप्रदांशी लग्न केले. ही बातमी सगळ्यांसाठी धक्का होती. विशेष म्हणजे, जयाप्रदांसोबत लग्न केल्यानंतरही श्रीकांत नाहटा यांना पहिल्या पत्नीपासून मुल झाले. एकंदर काय तर लग्न करूनही जयाप्रदा या कायम एकट्या राहिल्या.

लग्नानंतरही जयाप्रदा चित्रपटांत काम करू लागल्या. पण हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. पुढे १९९४ मध्ये जयाप्रदा यांनी तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. पुढे समाजवादी पक्षात प्रवेश केला. २००४ व्या लोकसभा निवडणुकीत जयाप्रदा रामपूरमधून निवडून आल्या आणि लोकसभेत पोहोचल्या. पण २०१० मध्ये   कथितरित्या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाने त्यांना बडतर्फ केले. त्यामुळे मार्च २०१४ मध्ये जयाप्रदा यांनी राष्ट्रीय लोकदलाचा झेंडा हाती घेतला आणि सरतेशेवटी भाजपात सामील झाल्या.

Web Title: Birthday Special: know some lesser known facts about jayaprada life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.