ठळक मुद्देचित्रपटाच्या सेटवर तनुजांच्या नख-यांनी अख्खी टीम वैतागली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांचा आज वाढदिवस. अभिनेत्री काजोलची आई अशीही त्यांची एक ओळख. तनुजाच्या आई शोभना समर्थ एक दिग्गज अभिनेत्री होत्या. साहजिकच आईकडूनच तनुजा यांना अभिनयाचा वारसा मिळाला. आईनेच तनुजा यांना लॉन्च केले.  1950 मध्ये बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरु केल्यानंतर 1960 मध्ये ‘छबीली’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यांना खरे यश मिळाले ते 1961 मध्ये प्रदर्शित ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाद्वारे.

 तनुजा त्यांच्या बिनधास्त अ‍ॅक्टिंगसाठी जशा ओळखल्या जात, तसाच त्यांचा स्वभावही बिनधास्त होता. सुरुवातीपासूनच प्रचंड चंचल आणि मौजमस्ती करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाई. केवळ इतकेच नाही तर सेटवर त्या दाखवत असलेल्या नख-यांचीही त्याकाळी बरीच चर्चा होती. एकदा अशाच नख-यांमुळे तनुजा यांना दिग्दर्शकाने कानाखाली लावली होती.  होय, ‘हमारी याद आएगी’ या चित्रपटाच्या सेटवरचा हा किस्सा.

हा किस्सा त्याऐवळी अनेक मॅगझिनची हेडलाईन बनला होता. केदार शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.  चित्रपटाच्या सेटवर तनुजांच्या नख-यांनी अख्खी टीम वैतागली होती. एकीकडे केदार शर्मा त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखले जात तर तनुजा बिनधास्त स्वभावासाठी. केदार शर्मा यांच्यासमोरही तनुजा मस्तीच्या मूडमध्ये असत. कुठलेही काम गंभीरपणे घ्यायचेच नाही, असाच हा प्रकार होता. चित्रपटाच्या एका दृश्यात तनुजा यांना हिरोसमोर रडायचे होते. पण अनेकदा रि-टेक होऊनही तनुजा हे दृश्य देऊ शकल्या नाहीत. पण याचे दु:ख वाटण्याऐवजी त्या खिदळू लागल्या.

आधी केदार यांनी तनुजा यांना  समजावून बघितले. पण समजण्याऐवजी, आज माझे रडण्याचे मूड नाही. हा सीन नंतर केव्हातरी शूट करू, अशा शब्दांत तिने केदार यांना सुनावले. तनुजा यांच्या तोंडचे हे वाक्य ऐकून केदार इतके संतापले की, मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यांनी तनुजांच्या थोबाडीत मारली. अख्खी टीम हे पाहून स्तब्ध झाली.

आधी तनुजा यांचे रडण्याचे मूड नव्हते. पण यानंतर बराच वेळ त्या रडत होत्या.  तनुजाच्या आई शोभना यांना ही गोष्ट कळली तेव्हा आपल्या मुलीचीच चूक आहे, हे त्या समजल्या. त्यांनी तनुजाला समजावले आणि दुस-या दिवशी सेटवर घेऊन गेल्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special: director kedar sharma slapped kajol mother tanuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.