ठळक मुद्देअर्शद तर कधीच मारियाच्या प्रेमात पडला  होता. पण मारिया प्रेमाची कबुली देईना. 

आपल्या ‘कॉमिक टाइमिंग’साठी ओळखला जाणारा अभिनेता अर्शद वारसी याचा आज (१९ एप्रिल) वाढदिवस.   १९ एप्रिल १९६८ साली जन्मलेल्या या अभिनेत्याने अपार संघषार्नंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण त्याला खरी ओळख दिली ती २००३ साली आलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि यानंतर २००६ मध्ये आलेल्या ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील सर्किट या भूमिकेने.

आज अर्शदची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. पण एकेकाळी हाच अर्शद एका एका पैशासाठी मोताद होता. अर्शद १८ वर्षांचा असताना त्याचा वडिलांचा बोन कॅन्सरने मृत्यू झाला. वडिलाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांतच आईनेही साथ सोडली. गरिबीमुळे दहावीनंतर त्याने शिक्षण सोडून दिले.याकाळात पैशाची गरज होती. मग काय, अर्शदने घरोघरी जावून सौंदर्य प्रसाधने विकण्याचे काम स्वीकारले. इतकेच नाही तर त्याने फोटो लॅबमध्येही काम केले़ पुढे तो चित्रपटात आला आणि सगळ्यांचा आवडता बनला. आज याच सर्वांच्या लाडक्या अभिनेत्याची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

होय, अर्शदची लव्हस्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी इंटरेस्टिंग नाही. डान्स ग्रूप चालवत असताना मारिया नावाची एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली आणि हीच मारिया त्याची आयुष्यभराची जोडीदार बनली.
मारिया अर्शदला कुठे भेटली, कशी भेटली हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर एकदा अर्शदला मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये आयोजित मल्हार फेस्टिव्हलमध्ये जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. याच ठिकाणी त्याला मारिया प्रथम दिसली आणि अर्शद या सुंदर मारियावर असा काही भाळला की, त्याने तिथेच मारियाला आपल्या डान्स ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्रस्ताव दिला. कॉलेजमध्ये आलेला जज आपल्याला त्याच्या डान्स ग्रूपमध्ये येण्यास म्हणतोय म्हटल्यानंतर कोण नकार देईल. मारियाने लगेच होकार दिला. यानंतर मारिया आर्शदला असिस्ट करू लागली. यानिमित्ताने दोघांची रोज भेट होऊ लागली.

अर्शद तर कधीच मारियाच्या प्रेमात पडला  होता. पण मारिया प्रेमाची कबुली देईना. मारियाच्या डोळ्यांत अर्शदबद्दल प्रेम दिसायचे पण अद्याप तिने तिचे प्रेम व्यक्त केले नव्हते. एकदा अर्शद व मारिया दुबई टूर गेले. याठिकाणी अर्शदने मारियाला कोल्ड ड्रिंकमध्ये बिअर पाजली. मग काय मारियाने नशेत अर्शदवरच्या प्रेमाची कबुली दिली. मारियाने कबुली दिल्यावर अर्शद लग्नासाठी उतावीळ झाला होता. पण खरी अडचण पुढे होती. कारण मारियाचे आईवडिलांचा या लग्नाला कडाडून विरोध होता.

 परंतु प्रत्यक्ष भेटल्यावर अर्शदने त्यांचेही मन जिंकले. अर्शदच्या कुटुंबीयांना मुस्लिम पद्धतीने लग्न करायचे होते. तर मारियाच्या कुटुंबीयांना ख्रिश्चन पद्धतीने लग्न हवे होते. अखेर  मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न झाले आणि मारिया कायमची अर्शदची झाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: birthday special bollywood actor arshad warsi and maria love story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.