बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. भूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भूमी सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी संवादही साधत असते. रुपेरी पडद्यावर भूमीचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज आपण पाहिला आहे. पण खऱ्या आयुष्यातही भूमी तितकीच बोल्ड व ग्लॅमरस आहे. इतकेत नाही तर भूमी तिची मते बेधडकपणे मांडत असते. त्यामुळे ती सेक्स आणि इतर बोल्ड गोष्टींवर उघडपणे मत मांडत असते.


अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती. तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडिया, सांड का आँख व पति पत्नी और वो यासारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.


पति पत्नी और वो सिनेमात अनेक बोल्ड डॉयलॉग्स होते. भूमीच्या वाट्यालाही असे अनेक बोल्ड डायलॉग आले होते. सिनेमात भूमीवर एक सीन चित्रित करण्यात आला आहे. कार्तिक लग्नासाठी मुलगी बघायला जातो तेव्हा तो “आपको क्या करना पसंत है?,” असा प्रश्न भूमीला विचारतो. त्यावर भूमी “मुझे सेक्स बहुत पसंद है,” असं उत्तर देते. हा डॉयलॉग म्हणताना नेमका डोक्यात काय विचार होता? थोडे अवघडल्यासारखे वाटले नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर भूमीने सांगितले की, हा डायलॉग बोल्ड असला तरीही आजच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलीच्या तोंडी दाखवण्यात आल्याने त्यामध्ये विचित्र वाटण्यासारखं काही नव्हतं,” बिनधास्तपणे दिलेल्या या उत्तरावर अनेकांनी भूवया उंचावल्या असल्या तरी दुसरीकडे तिने साकारलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. भूमी लवकरच तख्त आणि डॉली किटी और वह चमकते सितारे या चित्रपटात झळकणार आहे.


भूमी पेडणेकर सध्या तिच्या अफेयरमुळे चर्चेत आली आहे. भूमी बॉलिवूडच्या एका हिरोच्या प्रेमात पडल्याचे सध्या कानावर येतेय. हा हिरो कोण तर जॅकी भगनानी. फिल्मफेअरने दिलेल्या वृत्तानुसार, भूमी व जॅकी यांच्यात सध्या एक वेगळेच बॉन्डिंग पाहायला मिळेतय. आत्तापर्यंत या दोघांत केवळ मैत्री होती. पण आता ही मैत्री यापलीकडे गेल्याचे कळतंय. इंटेक्स्ट लाइव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, आता जॅकी तिला प्रोफेशनल सल्लेदेखील देऊ लागलाय.

अद्याप भूमी आणि जॅकीने आपले नाते जगजाहिर केलेले नाही. पण दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही. तूर्तास दोघांनीही आपल्या लिंकअपच्या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण येत्या दिवसांत दोघेही यावर काय प्रतिक्रिया देतात, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Birthday Special: Bhumi Pednekar is as bold and unassuming as he is in real life, he talks openly about sex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.