बॉलिवूडमध्ये सध्या फेस अ‍ॅप चॅलेंजचं वेड लागल्याचं पहायला मिळतं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सेलिब्रेटी अ‍ॅपच्या माध्यमातून वयस्कर लूक शेअर करत आहेत. तर दुसरीकडे बिपाशा बासूने तिचा जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा जवळपास वीस वर्षे जुना फोटो आहे. हा बिकनीतील फोटो असून तिला पुन्हा टॅन लूक हवा असल्याची इच्छा तिने व्यक्त केलीय.

बिपाशाने सध्या बॉलिवूडमधून ब्रेक घेतला आहे आणि ती सध्या करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केल्यानंतर खासगी आयुष्य एन्जॉय करत आहे. बिपाशा इंस्टाग्रामवर खूप सक्रीय आहे आणि ती फोटो शेअर करत असते. बिपाशाची बॉलिवूडमधील हॉट अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. तसेच तिला डस्की ब्युटी संबोधले जाते. बिपाशाने नुकताच इंस्टाग्रामवर वीस वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून बिपाशानं लिहिलं की, ब्रॉन्झ रंगात मला रंगवून टाका. मला हे टॅन पुन्हा हवे आहे. यासाठी ऊन आणि बीचची गरज आहे.


यापूर्वी बिपाशानं एका मासिकाच्या कव्हर पेजवरील फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती बिकनीमध्ये दिसते आहे. हे फोटोशूट १९९८चं असून त्यावेळी बिपाशा मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरक होती. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा प्रयत्न करत होती. २००१ साली अजनबी चित्रपटातून तिने सिने कारकीर्दीला सुरूवात केली. हा फोटो शेअर करून बिपाशानं म्हटलं की हा तिचा पहिला स्विम सूट फोटोशूट आहे.


बिपाशा बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे.

शेवटची ती २०१५ साली अलोन चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत होती आणि तिच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर मुख्य भूमिकेत होता.

या चित्रपटानंतरच ते दोघे लग्नबेडीत अडकले होते.

Web Title: Bipasha Basu's throwback pics from modeling days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.