ठळक मुद्देबिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते. करणचे हे तिसरे लग्न होते.

बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंग ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तसे हे कपल आपल्या फिटनेस फोटो व व्हिडीओमुळे चर्चेत असते. पण आता हे कपल वेगळ्या कारणाने चर्चेत आले आहे. होय, दोघांचा एका नवजात बाळासोबतचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये करणसिंगच्या हातात बाळ आहे आणि बिपाशाच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.
बिपाशा व करणचे हे फोटो व्हायरल झालेत आणि नेटक-यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला. अर्थात बेबी कधी झाला? असा प्रश्नही अनेकांना पडला.

तुम्हीही बिपाशा व करणला शुभेच्छा द्याल, त्याआधी पुढची बातमी नक्की वाचा. होय, बिपाशा व करणच्या हातातील गोंडस बाळ आणि दोघांच्या चेह-यावरचा आनंद पाहता चाहत्यांना प्रश्न पडणे साहजिकच आहे. पण हे बाळ बिप्स व करणचे नाही. होय, ते आहे ‘हेट स्टोरी’ फेम अभिनेता विवान भटेना याचे आणि हा फोटो आहे जून 2019 मधील. 

विवानची वाईफ निखिलाने  2019 मध्ये एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला होता. बिपाशा व करण या चिमुकलीला पाहायला विवान व निखीलाच्या घरी गेले होते. तेव्हा त्यांनी तिच्यासोबत हे क्यूट फोटो काढले होते. विशेष म्हणजे, करणने हे फोटो शेअर केले होते.त्यात  त्याने विवान व निखीलाचे अभिनंदन करत दोघांना मुलीच्या जन्माच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. हेच फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

बिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते. करणचे हे तिसरे लग्न होते. सध्या बिप्स व करण दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघेही रोमॅन्टिक लाईफ जगत आहेत.

Web Title: bipasha basu karan singh grover welcome new baby girl during lockdown-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.