बॉलिवूडचे लोकप्रिय कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.२३ फेब्रुवारीला करण सिंग ग्रोव्हरचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी बिपाशा नवऱ्यासोबत मालदीवला केली आहे.

बिपाशा बासूने इंस्टाग्रामवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना करण बिपाशा दिसले. तसेच दोघांनी रोमँटिक पोझमध्ये फोटोदेखील क्लिक केले.

या फोटोमध्ये करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बासू एकमेकांना किस करताना दिसले. त्या दोघांचे फोटो खूप व्हायरल होत आहेत.

बिपाशा व करण सिंग ग्रोव्हरने ३० एप्रिल, २०१६मध्ये लग्न केले. करणचे हे तिसरे लग्न आहे. ते दोघे एकत्र परफेक्ट दिसतात. दोघेही फिटनेस फ्रिक आहेत. 


करण व बिपाशा या दोघांनी एकत्र अलोनमध्ये काम केले होते. या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. अलोनशिवाय करण सिंग ग्रोव्हर हेट स्टोरी ३, थ्रीदेवमध्ये दिसला आहे. 


करण सिंग ग्रोव्हरने कसौटी जिंदगी की २ मालिकेत मिस्टर बजाजची भूमिका केली होती. 

Web Title: Bipasha Basu and Karan Singh Grover romantic liplock in pool at Maldives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.