Bihar IPS officer Vinay Tiwari freed from quarantine, must go home by Saturday | सुशांत प्रकरण : बिहार आयपीएस विनय तिवारी अखेर ‘क्वारंटाइन मुक्त’, दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश

सुशांत प्रकरण : बिहार आयपीएस विनय तिवारी अखेर ‘क्वारंटाइन मुक्त’, दोन दिवसांत मुंबई सोडण्याचे आदेश

ठळक मुद्देसुशांतप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे आहे. सीबीआयने याप्रकरणी रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झालेले बिहारचे शहर पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना बीएमसीने बळजबरीने क्वारंटाइन केले होते. बीएमसीच्या या कृत्याची प्रचंड निंदा झाली होती. सुप्रीम कोर्टानेही यावरून महाराष्ट्र सरकारला फटकारले होते. बिहार सरकारनेही यावर आक्षेप घेतला होता. इतक्या सर्व घडामोडीनंतर अखेर विनय तिवारींना क्वारंटाइनमधून मुक्त करण्यात आले आहे.  यापाठोपाठ दोन दिवसांत मुंबई सोडा, असे आदेश मुंबई पोलिकेने त्यांना दिले आहेत. 

बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांत प्रकरणाच्या तपासासाठी   2  ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले होते. मुंबईत आल्यावर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना क्वारंटाइन केल्यावरून बिहार सरकारने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. विनय तिवारींना बिहारमध्ये परतण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. 

त्यानुसार आता विनय तिवारींना डिस्चार्ज देण्यात आले आहे. 8  ऑगस्ट आधी महाराष्ट्रातून पुन्हा बिहार जावे, अशी सूचनाही पालिकेने त्यांना केली  आहे. लॉकडाउन नियमावलीनुसार, सात दिवसात एखाद्या अत्याआवश्यक कामासाठी आलेली व्यक्तीला मुळगावी जाता येते. पण सात दिवसाचा न परतल्यास त्या व्यक्तीस चाचणी करणे तसेच पुढील सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल. या नियमांनुसार, विनय तिवारींना दोन दिवसांत मुंबई सोडावी लागेल, असे मुंबई पालिकेने स्पष्ट केले आहे.
सुशांतप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे आहे. सीबीआयने याप्रकरणी रिया चक्रवर्तीसह एकूण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे, गुन्हेगारी षडयंत्र रचणे, चोरी-फसवणूक आणि धमकावणे यासारखे गुन्हे या सर्वांवर नोंदवण्यात आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bihar IPS officer Vinay Tiwari freed from quarantine, must go home by Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.