ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्न केले होते.

बिग बॉस हा कार्यक्रम सुरुवातीला हिंदीत सुरू झाला होता. पण त्याची लोकप्रियता पाहाता मराठी तसेच अनेक दाक्षिणात्य भाषेत हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे आजवर अनेक स्पर्धकांना प्रसिद्धी मिळाली आहे. बिग बॉस कन्नड मध्ये अभिनेत्री चैत्रा कोट्टूरने हजेरी लावली होती. या कार्यक्रमामुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. 

चैत्रा कोट्टूरच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. तिने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कौटुंबिक वादातून तिने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. लग्नानंतर ओढावलेल्या वादातून चैत्राने हे पाऊल उचलंल आहे. 8 एप्रिलला चैत्राने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आएएनएसने दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून चैत्रा नागार्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. चैत्राने तिच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी एका मंदिरात नागार्जुनसोबत लग्न केले होते. नागार्जुन हा व्यवसायिक असून या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चैत्राचे लग्न झाल्यामुळे तिचे फॅन्स प्रचंड खूश झाले होेते. मात्र लग्नाच्या काहीच दिवसानंतर नागार्जुनच्या कुटुंबियांनी चैत्रावर गंभीर आरोप केले होते. नागार्जुनला धमकावून हे लग्न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता आणि आता नागार्जुनने देखील काही लोकांच्या दबावाखाली येऊन लग्न केले असे म्हटले आहे. 

कोलारमधील पोलिस ठाण्यात चैत्राने तक्रार नोंदवली असून नागार्जुनच्या कुटुंबियांनी या लग्नाला मान्यता न दिल्याने चैत्राला त्याच्या घरातही प्रवेश नाकारला होता असे तिने तक्रारीत म्हटले आहे. तसेच त्याच्या घरातल्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे देखील तिने पोलिसांना सांगितले आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss Kannada contestant Chaitra Kotoor allegedly attempts suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.