'बिग बॉस' विजेत्याला ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. मात्र ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली. कारण एका टास्कमध्ये घरातील सदस्य राखी सावंत या रकमेपैकी १४ लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडली होती. त्यामुळे विजेती रुबीना दिलैकच्या वाट्याला ४४ लाख रुपये आलेत. या रकमेचे रुबीना दिलैकने काय केले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तिने हे पैसे कशावर खर्च केले हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्सुकता असेन. 

मात्र तिने ही रक्कम अद्याप खर्च केलेली नाही. कारण ही रक्कम तिला एका विशेष कामासाठी वापरायची आहे. जिंकलेली रक्कम रुबीनाला तिच्या गावाच्या विकासासाठी वापरायचा आहे. रुबीना नेहमीच तिच्या गावाविषयी बोलताना दिसते. त्यामुळे गावात वीज समस्या, रस्तेही चांगले नाहीत गावाचा विकास करण्यासाठी स्वतःहूनच पुढाकार घ्यायची गरज आहे. समस्येने गाठलेल्या  गावाला या सगळ्यांमधून मुक्त करायचे आहे. त्यामुळे जिंकलेल्या पैसे स्वतःसाठी खर्च न करता गावाच्या विकासासाठी खर्च व्हावेत अशी तिची इच्छा आहे.


रुबीनाने दिलेक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. रुबीनाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 'छोटी बहू' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. रुबीना  'शक्तिः अस्तित्व के अहसास की', 'बनू मैं तेरी दुल्हन', 'पवित्र रिश्ता', 'कसम से', 'पुनर्विवाह-एक नई उम्मीद', 'देवों के देव महादेव' यांसारख्या अनेक मालिकांमधून रसिकांचे मनोरंजन केले आहे. 

रुबीना अभिनयासोबतच मॉडलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. तिनं 'मिस शिमला 2006' आणि 'मिस नॉर्थ इंडिया 2008' हे किताबही जिंकले आहेत. रुबीनाने 2018 मध्ये अभिनव शुक्लासोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. अभिनवही अभिनेता असून बिग बॉसमध्ये रुबीनासह तोही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik Will spent winning amount on this social cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.