‘डर्टी पिक्चर’चा ‘दी एन्ड’ झाला नसता तर पुढच्या 3 वर्षात राज कुंद्रानं जमवली असती इतकी माया!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:57 PM2021-07-27T12:57:27+5:302021-07-27T12:58:21+5:30

Pornography Case : तयार होता तीन वर्षांचा प्लान, तर कमावला असता निव्वळ इतका नफा

Big revelations about Raj Kundara , plans to make so much profit in next 3 years | ‘डर्टी पिक्चर’चा ‘दी एन्ड’ झाला नसता तर पुढच्या 3 वर्षात राज कुंद्रानं जमवली असती इतकी माया!!

‘डर्टी पिक्चर’चा ‘दी एन्ड’ झाला नसता तर पुढच्या 3 वर्षात राज कुंद्रानं जमवली असती इतकी माया!!

Next
ठळक मुद्दे क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये 2 पानांचा समावेश आहे. यात दुस-या पानावर BollyFameशी संबंधित प्रोजेक्ट रेव्हेन्यु व खर्च दाखवण्यात आला आहे. हा तपशील पौंडमध्ये आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (Raj Kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case)अटक झाली आणि बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. अटकेनंतर राज कुंद्राबद्दल रोज नवे खुलासे होते आहेत. आता एक नवा खुलासा वाचून तुम्हीही थक्क व्हाल. राज कुंद्रानं ‘डर्टी पिक्चर’मधून कमावलेल्या पैशांचा आकडा आता समोर आला आहे. होय, ‘डर्टी पिक्चर’चा पर्दाफाश झाला नसता तर येत्या तीन वर्षांत राज कुठल्या कुठं असता, याचा खुलासा आता झाला आहे.

आपल्या हाती एक पावर पॉइन्ट प्रेजेंटेशन आल्याचा दावा झी मीडियानं केला आहे. यात राज कुंद्राला येत्या तीन वर्षांच्या कमाईच्या आकड्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  सर्वकाही ठरल्यानुसार सुरळीत असंच सुरू राहिलं असतं तर  पुढच्या तीन वर्षांत राज कुंद्राचा ग्रॉस रेव्हेन्यू 146 कोटी रुपये असता, असा दावा झी मीडियाच्या वृत्तात करण्यात आला आहे.

मुंबई क्राईम ब्रांचकडे असलेल्या पीपीटीनुसार,  पुढच्या तीन वर्षांत म्हणजेच 2021 पासून 2024 पर्यंतचा  राज कुंद्राचा प्लान तयार होता. पुढच्या तीन वर्षात प्लान बी म्हणजेच BollyFame नावाच्या अ‍ॅपच्या माध्यमातून होणाºया कमाईचा अंदाज लक्षात घेतला तर 2021-22 या वर्षात या अ‍ॅपच्या माध्यमातून राजची कमाई  36,50,00,000 रूपयांच्या घरात असती. तर नेट प्रॉफिटचा आकडा 4,76,85000 असता.
 2022-23 वर्षासाठी त्यानं 7,3,00,00,000  कोटी रूपये कमाईचे लक्ष्य ठेवले होते.  यानुसार नेट प्रॉफिटचा आकडा 4,76,85,000 असता. त्याचप्रमाणे 2023-24 मध्ये राज कुंद्राची कमाई अनेक पटींनी वाढली असती. 
 क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये 2 पानांचा समावेश आहे. यात दुस-या पानावर BollyFameशी संबंधित प्रोजेक्ट रेव्हेन्यु व खर्च दाखवण्यात आला आहे. हा तपशील पौंडमध्ये आहे.

Web Title: Big revelations about Raj Kundara , plans to make so much profit in next 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app