बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी एकानंतर एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यात आता आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा हाउस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यामध्ये वीस मिनिटांपर्यंत बातचीत झाली होती.

14 जून रोजी त्या दोघांमध्ये संभाषण झाले आणि त्यानंतरही ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. या नव्या खुलाशानंतर हे दोघे एवढा वेळ काय बोलत होते, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आधीदेखील ही बाब समोर आली होती की सॅम्युअल रियाचा खूप खास व्यक्ती होता. कित्येक वेळा त्याने सुशांतच्या खात्यातून पैसे काढले.

या खुलाशानंतर आता सुशांतच्या आत्महत्येचा संशय त्याच्यावर जातो. चौकशीदरम्यान त्या दोघांमध्ये काय बातचीत झाली हे विचारू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार सॅम्युअल आणखीन दुसरे नंबरदेखील आहेत. ज्याची चौकशी होते आहे. किती वेळा रियासोबत वॉट्स अॅपवर बोलणे झाले हेही तपासले जात आहे.

दिशा सालियानचे वडील सतीश सालियन यांनी मुंबईतील मालवणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तीन लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तिघांवर दिशाच्या मृत्यूप्रकरणी अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. या तिघांविरोधात कारवाई करण्याची मागणी मुंबई पोलिसांकडे केली आहे.


सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या घरी दोन दोन अॅम्बुलन्स का आले, या गोष्टींवरून प्रश्न विचारले जात आहे. दोन एम्बुलन्स मागवण्यामागे काय उद्देश होता. जस्टीस फॉर सुशांतचे प्रभारी विशाल सिंग राजपूत यांनी सांगितले की हे सगळे ठरवून रचलेला कट आहे. सीबीआय चौकशीत सगळे समोर येईल. विशाल यांच्यानुसार जोपर्यंत सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही मोहिम कायम राहणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Big revelation from call details, Riya had a conversation with this person for 20 minutes before Sushant's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.