ठळक मुद्देतापसी पन्नूसोबत एका हॉरर चित्रपटातही भूमी दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.

अभिनेत्री भूमी पेडणेकर ‘दम लगा के हइशा’मधून बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री घेतली. या पहिल्या चित्रपटासाठी भूमीला बेस्ट फिमेल डेब्यू अ‍ॅक्ट्रेसचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावरही या चित्रपटाने नाव कोरले. यानंतर भूमीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भूमीने एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. येत्या दिवसांत भूमीचे एक-दोन नाही तर एका पाठोपाठ एक असे सहा सिनेमे रिलीज होणार आहेत.
डॉली किट्टी और वो चमकते सितारे, सांड की आंख, पती पत्नी और वो, बाला, तख्त याशिवाय एका हॉरर चित्रपटात भूमी दिसणार आहे.

डॉली किट्टी और वो चमकते सितार
‘लिपस्टिक अंडर माई बुरखा’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाºया अलंकृता श्रीवास्तव ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ हा सिनेमा घेऊन येत आहेत. यात भूमी लीड रोलमध्ये आहे. तिच्यासोबत कोंकणा सेनही यात मुख्य भूमिकेत आहे. गतवर्षी या चित्रपटाचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले होते.

सांड की आंख
अनुराग कश्यप निर्मित ‘सांड की आंख’ या चित्रपटात भूमी व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर या महिला शूटरच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी करणार आहेत.

पती पत्नी और वो
१९७८ मध्ये रिलीज संजीव कुमार स्टारर ‘पती पत्नी और वो’चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यात भूमीशिवाय अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित हा चित्रपट यावर्षी ६ डिसेंबरला रिलीज होतोय.

बाला
या चित्रपटात भूमी व आयुष्यमान खुराणाची जोडी तिसºयांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यापूर्वी ‘दम लगा के हईशा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात ही जोडी दिसली होती.

तख्त
करण जोहर निर्मित ‘तख्त’ या मल्टिस्टारर चित्रपटातही भूमीची वर्णी लागली आहे. या चित्रपटात करिना कपूर, आलिया भट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल, रणवीर सिंग असे अनेक दमदार कलाकार आहेत.

हॉरर सिनेमा
तापसी पन्नूसोबत एका हॉरर चित्रपटातही भूमी दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण यात एका जहाजावरची कथा दिसेल. भानू प्रताप सिंह हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.


 

Web Title: Bhumi Pednekars 6 Movies Release In Back To Back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.