भूमी पेडणेकरला स्कूलमधून दिलं होतं हाकलून, १३ लाखांचं कर्जही फेडावं लागलं होतं.....

By गीतांजली | Published: October 30, 2020 12:12 PM2020-10-30T12:12:27+5:302020-10-30T12:31:15+5:30

भूमी पेडणेकर ही चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

Bhumi pednekar was thrown out of film school she also had to repay education loan of rs 13 lakh | भूमी पेडणेकरला स्कूलमधून दिलं होतं हाकलून, १३ लाखांचं कर्जही फेडावं लागलं होतं.....

भूमी पेडणेकरला स्कूलमधून दिलं होतं हाकलून, १३ लाखांचं कर्जही फेडावं लागलं होतं.....

googlenewsNext

 भूमी पेडणेकर ही चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे, पण भूमीला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे. रिपोर्टनुसार भूमी म्हणाली, तिला फिल्म स्कूलमधून काढून टाकण्यात आले होते यानंतर तिला  शैक्षणिक कर्जाचे 13 लाख रुपये परत करावे लागले होते. या प्रतिकूल परिस्थितीतही भूमीने हार मानली नाही आणि यश मिळविण्यासाठी प्रयत्न केले.

डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत भूमी म्हणाली, अभिनेत्री होण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. सगळ्यात आधी माझ्या आई- वडिलांना समजवण्यचा प्रयत्न केला की मला अभिनेत्री बनायचं आहे. मी हिम्मत करुन त्यांने ही गोष्ट सांगितली ते खुश नव्हते आणि मला वाटले ते माझ्यासाठी प्रोटेक्टिव्ह होतायेत. मी फिल्म स्कूल ज्वॉइन केली. 

भूमीने पुढे सांगितले, मला फिल्म स्कूलमधून यासाठी नाही काढण्यात आले की मी एक चांगली अभिनेत्री नव्हती तर मी शिस्तबद्ध नव्हते यासाठी मला काढण्यात आले. तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. माझ्या डोक्यावर 13 लाखांचे कर्ज होते. ही एक मोठी रक्कम होती. भूमीने सांगितले यानंतर तिने नोकरी शोधण्याची सुरुवात केली. यशराजमध्ये तिला कास्टिंग असिस्टंटची नोकरी मिळाली.तिने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Web Title: Bhumi pednekar was thrown out of film school she also had to repay education loan of rs 13 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.