ठळक मुद्देकपिलने पुढे तिला विचारले, “भूमी, तुझ्या या भव्य यशाचे श्रेय तू कोणाला देशील?” यावर क्षणाचाही विलंब न करता भूमीने उत्तर दिले, “द कपिल शर्मा शो”.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये या भागात आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम येणार आहेत. आपल्या ‘बाला’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात ते करणार आहेत. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ड्रीमगर्ल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी आयुष्मानने या कार्यक्रमात हजेरी लावली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यामुळे आयुषमानने या कार्यक्रमात सांगितले होते की, हा कार्यक्रम त्याच्यासाठी खूप शुभ आहे. यावेळी भूमी देखील आपल्या चित्रपटांच्या यशात या शोची भूमिका असल्याचे कबूल करताना दिसणार आहे. या शो मध्ये कपिलने दम लगा के हैशा, टॉयलेट- एक प्रेमकथा, शुभ मंगल सावधान व सांड की आंख चित्रपट दिल्याबद्दल भूमीचे कौतुक केले आणि त्याने भूमीला ‘नायिकांमधील आयुषमान खुराना’ असे संबोधले. कपिलने पुढे तिला विचारले, “भूमी, तुझ्या या भव्य यशाचे श्रेय तू कोणाला देशील?” यावर क्षणाचाही विलंब न करता भूमीने उत्तर दिले, “द कपिल शर्मा शो”. यामी गौतम आणि आयुषमान खुराना या दोघांनी एकाच चित्रपटातून पदार्पण केले होते, तो खूप गाजला होता. शिवाय, भूमीचा पहिला चित्रपट देखील आयुषमानसोबतच होता.


 
या कार्यक्रमात पुढे कपिलने या अफवेबद्दल चौकशी केली की, भूमी कधी कधी पटकथा न ऐकताच चित्रपट स्वीकारते. केवळ या आशेने की तिला कपिलला भेटायची संधी मिळेल. हे मान्य करत भूमी म्हणाली, “ही काही अफवा नाही, हे सत्य आहे.” तिने सांगितले की, तिला कपिलच्या शोमध्ये यायला आणि कपिल, अर्चना आणि शो मधील कलाकारांसोबत मजा करायला खूप आवडते.

Web Title: bhumi pednekar told about secrets in the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.