बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत चर्चेत असते. पण सध्या तिचा एक फोटो चर्चेत  आला आहे. होय, सोशल मीडियावर तिच्या या फोटोची चांगली चर्चा होताना दिसतेय. भूमीने साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे. 

भूमी पेडणेकर हिने इंस्टाग्रामवर नारंगी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केला आहे. तिने म्हटलं की, रसबरी


या फोटोत ती खूप ग्लॅमरस व बोल्ड दिसते आहे. भूमी पेडणेकर हिच्या साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षांव होतो आहे. 


काही दिवसांपूर्वी भूमीने अफव्हाईट व काळ्या रंगाच्या साडीतील देखील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोतून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

भूमी पेडणेकरचा नुकताच ‘सांड की आंख’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तापसी पन्नू ही सुद्धा मुख्य भूमिकेत होती. शूटर दादी नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन महिलांची भूमिका त्या दोघींनी साकारल्या होत्या.

वयाच्या साठीत शूटींगची सुरुवात करणाऱ्या या शूटर दादींनी अनेक मेडल जिंकले आहेत. या चित्रपटाची समीक्षकांनी खूप प्रशंसा मिळाली. तसेच या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

आता भूमी पेडणेकर पति पत्नी और वो या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत आहेत. 

Web Title: Bhumi Pednekar shared orange saree photos on Instagram, See her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.