Bhumi Pednekar applies makeup in her ‘messy room’, post video | भूमी पेडणेकरवर का आलीय स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची वेळ, पाहा हा व्हिडिओ

भूमी पेडणेकरवर का आलीय स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची वेळ, पाहा हा व्हिडिओ

ठळक मुद्देभूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अभिनेत्री, अभिनेत्यांकडे त्यांची संपूर्ण टीम असते. मेकअप करायला, हेअरस्टाईल करायला वेगवेगळी मंडळी असतात. पण असे असूनही भूमी पेडणेकरवर स्वतःचा मेकअप स्वतः करण्याची वेळ आली आहे. तिनेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

भूमीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तू खूपच चांगल्याप्रकारे मेकअप करते असे चाहते तिला सांगत आहेत. सामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. तुझ्याकडून आम्ही क्लासेस घेण्याची गरज आहे असे एकाने कमेंट केले आहे तर तू मेकअपशिवाय देखील खूप छान दिसते असे एकाने तिला कमेंटद्वारे म्हटले आहे. 

भूमीने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. भूमी सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांशी संवादही साधत असते. रुपेरी पडद्यावर भूमीचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज आपण पाहिला आहे. अभिनेत्री बनण्यापूर्वी भूमी यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डिरेक्टर शानूची असिस्टंट होती.

भूमीने दम लगा के हईशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शुभ मंगल सावधान, टॉयलेट एक प्रेमकथा, सोन चिडियाँ, सांड की आँख व पति पत्नी और वो यांसारख्या चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhumi Pednekar applies makeup in her ‘messy room’, post video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.