ठळक मुद्देबॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतोय.

भोजपुरी अभिनेता रवी किशन याची मुलगी रीवा किशन बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. होय, ‘सब कुशल मंगल’ या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करतोय. म्हणजेच रीवा व प्रियांक दोघांचाही हा डेब्यू सिनेमा असणार आहे.
करण कश्यप या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि निर्माता नितीन मनमोहन यांची मुलगी प्राची ही या चित्रपटाची निर्माती आहे. नितीन मनमोहन यांनीच रवी किशन यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला होता. आता नितीन मनमोहन यांची मुलगी रवी किशनच्या मुलीला ब्रेक देणार आहे.
साहजिकच आपल्या बॉलिवूड डेब्यूबद्दल रीवा कमालीची उत्सूक आहे. मला फोन कॉल आला, तेव्हा मी अमेरिकेत होते. पापांचे मित्र मोईन बेग अंकल यांचा मला फोन आला आणि त्यांनीच मला ही आनंदाची बातमी दिली,असे रीवाने सांगितले.


मुलगी बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय म्हटल्यावर साहजिकच रवी किशन जाम आनंदात आहे. मला अभिनय करताना आणि शिकतांना पाहूनचं रीवा मोठी झाली. तिला लहानपणापासूनचं अभिनयाचे अंग आहे आणि याचमुळे तिचे भविष्य उज्ज्वल आहे. मला तिचा अभिमान आहे, असे रवी किशन म्हणाला.
रीवाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या प्ले ग्रूपसोबत तिने एक वर्षे घालवले. अमेरिकेतील अ‍ॅक्टिंग स्कूलमध्येही तिने अभिनयाचे धडे गिरवले. इतक्या तयारीनंतर रीवा बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. आता तिचे हे पदार्पण किती यशस्वी ठरते, ते बघूच.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bhojpuri Superstar Ravi Kishan's Daughter Riva Debut in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.