ठळक मुद्दे राणीने २००४ मध्ये मनोज तिवारीच्या अपोजिट ‘ससुरा बड़ा पैसावाला’ या भोजपुरी सिनेमामध्ये डेब्यू केला होता.  

भोजपुरी सिनेमा वेगाने प्रगती करतोय. नवे प्रगत तंत्रज्ञान, विदेशातील आऊटडोअर शूटींग या सगळ्यांमुळे या इंडस्ट्रीची लोकप्रियता वाढताना दिसतेय. भोजपुरी सिनेमाचे स्टार्स आणि त्यांच्या चर्चाही रंगताहेत. सध्या भोजपुरी स्टार राणी चॅटर्जी हिची जोरदार चर्चा आहे. होय, भोजपुरी सिनेप्रेमींमध्ये राणीची प्रचंड के्रज आहे. आता हीच राणी लवकरच लग्नबंधात अडकणार आहे. राणीने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला.


यापूर्वी राणी व पवन सिंग यांच्या अफेअरच्या चर्चा पसरल्या होता. पण आता स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत राणीने वेगळाच खुलासा केला. मी कुण्या दुसºयाच डेट करतेय, असे तिने सांगितले. अर्थात त्याची ओळख तिने जाहीर केली नाही. यावर्षी डिसेंबरपर्यंत आपण लग्न करणार असल्याची कबुलीही तिने दिली. विशेष म्हणजे, राणीचा राजकुमार हाही भोजपुरी इंडस्ट्रीतलाच आहे.


‘मला माझे प्रेम मिळाले. आम्ही एकमेकांना डेट करतोय. यावर्षी डिसेंबरपर्यंत लग्न करण्याचा आमचा प्लान आहे. निश्चित तारीख सध्यातरी सांगता येणार नाही. मी कुणाला डेट करतेय, हे मी सांगणार नाही. पण हो, लग्नाच्या काही महिन्यांआधी मी त्याची माझ्या चाहत्यांशी भेट घालून देईल. तो एक टीव्ही अ‍ॅक्टर आहे, सध्या मी एवढेच सांगू इच्छिते,’ असे राणीने सांगितले.


राणीच्या या खुलाशानंतर प्रत्येकजण तिच्या आयुष्यातील या मिस्ट्री मॅनबद्दल जाणून घेण्यास उत्सुक दिसतोय. राणीने २००४ मध्ये मनोज तिवारीच्या अपोजिट ‘ससुरा बड़ा पैसावाला’ या भोजपुरी सिनेमामध्ये डेब्यू केला होता.  

Web Title: bhojpuri actress rani chatterjee marrige with mystery man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.