ठळक मुद्देप्रभास 20 या चित्रपटात भाग्यश्री प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटासाठी प्रभासने चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे.

मैंने प्यार किया या चित्रपटाला अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही. या चित्रपटात आपल्याला सलमान खान आणि भाग्यश्री यांची जोडी पाहायला मिळाली होती. हा भाग्यश्रीचा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटामुळे भाग्यश्रीला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तिला आजही प्रेक्षक याच चित्रपटामुळे ओळखतात.

भाग्यश्रीला आता प्रेक्षकांना खूपच कमी चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. प्रेक्षकांची ही लाडकी भाग्यश्री आता एका चित्रपटात लवकरच झळकणार आहे. पण या चित्रपटात ती नायिकेच्या भूमिकेत नसून नायकाच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. हा नायक दुसरा कोणीही नसून बाहुबली फेम प्रभास आहे. प्रभास 20 या चित्रपटात भाग्यश्री प्रभासच्या आईच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटासाठी प्रभासने चित्रीकरण करायला सुरुवात देखील केली आहे. भाग्यश्री लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण करायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात भाग्यश्री आईच्या भूमिकेत असली तरी ही भूमिका खूपच महत्त्वाची असल्याने या भूमिकेबाबत अद्याप चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. 

प्रभासचा हा 20 वा चित्रपट असल्याने या चित्रपटाचे नाव प्रभास २० ठेवण्यात आले आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार असून या चित्रपटात पूजा हेगडे त्याच्या नायिकेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण करणार असून या चित्रपटात प्रभास एका ज्योतिषीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Bhagyashree lands a crucial role in Prabhas’ 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.