Beyonce Sharma Jayegi trends online, Internet apologises to singer Beyonce for Ananya-Ishaan's new song | अनन्या पांडे व ईशान खट्टरचे नवे गाणे पाहून फॅन्स का मागत आहेत बियॉन्सेची माफी?

अनन्या पांडे व ईशान खट्टरचे नवे गाणे पाहून फॅन्स का मागत आहेत बियॉन्सेची माफी?

ठळक मुद्देखाली पीली या सिनेमातील ‘बियॉन्से शरमा जाएगी’ हे गाणे नक्श अजीज व नीति मोहन यांनी गायले आहे.

आ बैल मुझे माऱ़़ अशी हिंदीत एक म्हण आहे. याचा अर्थ काय तर स्वत:हून संकट ओढवून घेणे. तूर्तास अनन्या पांडे व ईशान खट्टर यांच्या ‘खाली पीली’ या आगामी सिनेमाला ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. ‘खाली पीली’चे ‘बियॉन्से शरमा जाएगी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आणि सोशल मीडियावर अशा काही प्रतिक्रिया उमटल्या की, अनेकांना हिंदीतील ही म्हण आठवली.
तर गाणे आहे ‘बियॉन्से शरमा जाएगी’ हे गाणे ऐकल्यानंतर अनेक नेटकरी बियॉन्सेची माफी मागत आहेत. 

आता ही बियॉन्से कोण हे तुम्हाला ठाऊक नसेल तर तर ती अमेरिकेची लोकप्रिय पॉप स्टार आहे. बियॉन्से नोएल्स कार्टर तिचे पूर्ण नाव. बियॉन्से, क्वीन बे या नावांनी ती ओळखली जाते. तिचे गाणे जगभरातील चाहत्यांना वेड लावतात. तर ‘बियॉन्से शरमा जाएगी’ या गाण्यात याच बियॉन्सेचा उल्लेख केला गेला आहे. गाणे रिलीज होताच अनेकांनी यावरून अनन्या व ईशान यांना ट्रोल करणे सुरु केले आहे. या गाण्यानंतर काहींनी तर थेट बियॉन्सेची माफी मागितली आहे.


बियॉन्सेच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक येईल, हे सगळे पाहून. अनन्या पांडेची बियॉन्सेशी तुलना म्हणजे माझी टॉम क्रूजशी तुलना करण्यासारखे आहे. ये क्या बना दिए हो? अशी मजेशीर प्रतिक्रिया एका युजरने दिली.

अनन्या पांडे, पॅक अप कर, खूप पाहिले तुला, अशा शब्दांत एका युजरने अनन्याला ट्रोल केले.

एका युजरने तर अनन्याची जोरदार खिल्ली उडवली आहे. ‘20 सोलो ग्रॅमी अवार्ड जिंकणारी आणि 70 वेळा नॉमिनेट होणा-या बियॉन्सेने असे काय करायला हवे की, तिला अनन्या पांडेचे डान्स मुव्स पाहून लाज वाटू नये? ओह, तिला स्ट्रगल केला पाहिजे किंवा मग स्टुडंट आॅफ इअर3 मध्ये काम केले पाहिजे. करण जोहर तिला अफोर्ड करू शकेल काय ?’, असे या युजरने लिहिले आहे.

एका युजरने तर बॉलिवूडच्यावतीने बियॉन्सेची माफी मागितली आहे.
‘बॉलिवूडच्यावतीने मी बियॉन्सेची माफी मागू इच्छितो. मला इतकी लाज वाटतेय की, सांगू शकत नाही. बॉलिवूडला वर्गातील खोडकर मुलासारखे एका कोप-यात बसून आपल्या मूर्खपणावर चिंतन करायला हवे,’ असे या युजरने लिहिले आहे.


खाली पीली या सिनेमातील ‘बियॉन्से शरमा जाएगी’ हे गाणे नक्श अजीज व नीति मोहन यांनी गायले आहे. कुमार आणि राज शेखर यांनी हे गाणे लिहिले आहे तर विशाल-शेखर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. खाली पीली हा सिनेमा पुढील महिन्यात 2 तारखेला ओटीटीवर प्रदर्शित होतोय.

OTT वर कमाईचा नवा ट्रेंड : अनन्या व ईशानचा ‘खाली पीली’ पाहण्यासाठी दरवेळी मोजावे लागणार पैसे

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Beyonce Sharma Jayegi trends online, Internet apologises to singer Beyonce for Ananya-Ishaan's new song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.