कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. यामध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांचा देखील समावेश आहे. यामध्ये बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिकलाही कोरोनाची लागण झाली आहे.  याबाबतचा खुलासा तिने स्वतः सोशल मीडियावर केली आहे.

कोयल मल्लिकही बंगाली चित्रपटसृष्टीतील चर्चेतील चेहरा आहे. कोयलनेच इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने याबाबत खुलासा केला आहे. तिच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत होती. तीन-चार दिवस तिला याचा त्रास जाणवू लागला होता. 

तिच्या फॅमिली डॉक्टरांनी तिला कोविड-१९ ची चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. चाचणी केल्यानंतर समजले की, तिच्याबरोबर कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे.

 

कोयलने ट्विटरवरुन माहिती देत सांगितली की,सध्या आम्ही सगळे जण सेल्फ क्वारंटाइन आहोता. तिच्यासोबतच तिचे आई-वडील, पती निशपाल सिंह ऊर्फ राणे यांनाही करोनाची लागण झाली आहे. 

चिंतेची बाब म्हणजे कोयलला २ महिन्यांचं लहान बाळ असून ५ मे रोजी या बाळाचा जन्म झाला आहे. त्यामुळे सध्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनादेखील कोयलची काळजी वाटत आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओ तिने  खास आवाहन केलंय की, कोरोनाची कोणतीही लक्षण आढळली तर लगेचच कोविड-१९ ची चाचणी करून घ्या. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bengali star Koel Mallick, father Ranjit Mallick test coronavirus COVID-19 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.