बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्याला अधिक महत्त्व आहे त्यामुळे प्लॅस्टीक सर्जरी करत अनेक अभिनेत्रींनी मेकओव्हर केल्याची अनेक उदाहरणं आहेत.  याच यादीत मिनिषा लांबाचेही नाव मोडले जाते. 2005 साली सुजीत सरकारचा 'यहां' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 'कॉर्पोरेट', 'हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड' आणि 'दस कहानियां'  सारख्या सिनेमांतही ती झळकली. मात्र तिला खरी ओळख मिळवून दिली ती  2008 मध्ये प्रदर्शित झालेला 'बचना ए हसीनों'  सिनेमात माही भूमिकेत झळकली होती. सिनेमात रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि बिपाशा बसु यांच्या मुख्य भूमिका होत्या.  2013 मध्ये  'ब्लॅक करेंसी' आणि २०१७ मध्ये प्रदर्शित 'भूमी' हा तिचा अखेरचा सिनेमात ती झळकली. यानंतर तिने बॉलिवूडला अलविदा म्हटले.


तसेच 2005 मध्ये मिनिषाने नाकाची प्लास्टिक सर्जरी केली होती. त्यामुळे तिचा पूर्ण लूक बदलला होता. प्लास्टीक सर्जरी करण्यापूर्वीचे तिचा सिनेमातला लूक आणि त्यानंतरचा लूकमध्ये कमालीचा फरक जाणवतो. मात्र प्लॅस्टीक सर्जरीमुळे तिचा चेहराही खराब झाला.  त्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स मिळणेच बंद झाल्या. परिणामी मिनिषा सिनेसृष्टीपासून कधी दुरावली हे तिलाच कळाले नाही. अखेर 2015मध्ये मिनिषाने ब्वॉयफ्रेंड रियान थामसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली. 


काही दिवसांपूर्ची तिने तिचे हॉट बिकीनी फोटो शेअर करत सा-यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोत तिने काळ्या रंगाची बिकनी परिधान केली आहे. या लूकमध्ये  ती खूपच बोल्ड व ग्लॅमरस दिसते आहे. आता ती एक प्रोफेशनल पोकर प्लेअर बनली आहे. खुद्द तिनेच एका  मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

Web Title: Because of Nose Cosmetic Surgery Actress Minissha Lamba away from film industry almost for 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.