'बजरंगी भाईजान' या सुपरहिट सिनेमाला रिलीज होऊन पाच वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत. परंतु आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.  सिनेमातील मुन्नीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. या सिनेमातील मुन्नीच्या निरागसतेने रसिकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला होता. मुन्नीची भूमिका हर्षाली मल्होत्राने साकारली होती. 

बाल कलाकार म्हणून हा तिचा पहिला चित्रपट होता जो सुपरहिट ठरला. या सिनेमाने  कमाईचे अनेक रेकॉर्डही मोडले. बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेमुळे हर्षालीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. तिला या सिनेमासाठी स्क्रीन अवॉर्डचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला होता.

पण सिनेमात काम करण्यासाठी हर्षाली किती मानधन मिळालं हे तुम्हाला माहिती आहे का?, सिनेमात काम करण्यासाठी  हर्षाली मल्होत्राने दोन-तीन लाख रुपये घेतले. त्यावेळी हर्षाली अवघ्या सात वर्षांची होती. सुरूवातीला ‘बजरंगी भाईजान’च्या शूटिंगदरम्यान हषार्ली सतत रडायची. सलमानचा फायटिंग सीन वा इमोशनल सीन पाहिला की ती रडू लागायची. इतकेच नाही तर सलमान खानसोबत बोलताना ती प्रचंड लाजायची. पण हळूहळू दोघांतही चांगली मैत्री झाली.


 ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट करण्याआधी हषार्लीने कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मुन्नी आता बारा वर्षांची झाली आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bajrangi bhaijan munni fees for the film harshaali malhotra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.