'बाहुबली' चित्रपटात भल्लालदेवच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राणा दग्गुबाती गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी असं वृत्त आलं होतं की त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली आहे. असं सांगितलं जात होतं की, राणा दग्गुबातीची आई लक्ष्मीने तिची किडनी त्याला दिली आहे. मात्र या रिपोर्ट्सवर राना दग्गुबातीनं सांगितलं की ही फक्त अफवा आहे. मात्र नुकताच सोशल मीडियावर राणाने फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटत आहे. 


राणा दग्गुबातीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो एका ब्रॅण्डचं प्रमोशन करताना दिसत आहे. कधी हल्कसारखी बॉडी असणारा राणा या फोटोत खूप बारीक दिसतो आहे. हा फोटो पाहून चाहते वेगवेगळे तर्कवितर्क लावताना दिसत आहेत.


राणा दग्गुबातीच्या चाहत्याने त्याच्या फोटोवर कमेंट करत लिहिलं की, खूप वीक वाटत आहेस तर कुणी विचारतंय की सगळं काही ठीक आहे ना? तर काही लोकांना त्याचा फोटो पाहून तो राणा दग्गुबाती असल्याचा विश्वासच बसत नाही आहे.


 त्याच्या आजारपणाच्या अफवेवर राणा म्हणाला होता की, त्याच्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. ही न्यूज पूर्णपणे निराधार आहे. याबद्दल मी बोलून बोलून थकलो आहे. मी पूर्णपणे फिट व फाईन आहे. माझ्या मते माझी तब्येत खराब असल्याचा टॉपिक खूप बोरिंग आहे. मला आनंद आहे की लोक माझ्यावर इतकं प्रेम करतात. त्यांना माझी काळजी वाटते.


राणाने पुढे सांगितले की, तो आगामी बिग बजेट चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचं काम करत आहे. या चित्रपटाचं नाव आहे 'हिरण्यकश्यप'. हा एक धार्मिक चित्रपट आहे.

राणा तिथे व्हिएफएक्स कंपनीसोबत मिळून प्री प्रोडक्शनच्या कामात व्यग्र आहे.
 

Web Title: Bahubali Fame Rana Daggubati Looks Very Slim In His New Instagram Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.