ठळक मुद्देअनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’मधून पदार्पण केले होते.

‘बाहुबली 2’ या चित्रपटानंतर कधी नव्हे इतकी लोकप्रिय झालेली ‘देवसेना’ अर्थात साऊथ सुपरस्टार अनुष्का शेट्टी सध्या प्रेमात आकंठ बुडालीय. कुणाच्या तर एका भारतीय क्रिकेटपटूच्या. होय, खरे तर  ‘बाहुबली 2’नंतर अनुष्का व प्रभासच्या लव्ह लाईफच्या चर्चा सुरु झाल्या. दोघेही लग्न करणार, असेही मानले गेले. पण आता अनुष्का प्रभासला नव्हे तर एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा आहे.


हा क्रिकेटपटू साऊथचा नसून नॉर्थमधील असल्याचे कळतेय. अद्याप या क्रिकेटपटूचे नाव समोर आलेले नाही. पण सध्या साऊथमध्ये अनुष्का व या क्रिकेटपटूच्या अफेअरची चर्चा जोरात आहे. या क्रिकेटपटूसोबत अनुष्का लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. साहजिकच  हा क्रिकेटपटू नेमका कोण, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

तूर्तास अनुष्का ‘निशब्धम’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सायलेन्ट थ्रीलर सिनेमात अनुष्का म्युट आर्टिस्टची भूमिका साकारणार आहे. अनुष्कासोबत आर. माधवन लीड रोलमध्ये आहे. येत्या 21 तारखेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
 ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे अनुष्का जगभरात प्रसिद्ध झाली. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. चित्रपटसृष्टीत करियरला सुरूवात करण्यापूर्वी अनुष्का योगा इंस्ट्रक्टर होती. 

अनुष्काचे सौंदर्य पाहून तिला एका दिग्दर्शकाने चित्रपटाची ऑफर दिली होती. अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’मधून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. यातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आणि यानंतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही.
 मगधीरा, रुद्रमादेवी, वेदम, अरुंधति आणि सिंघम सीरिज यासारख्या अनेक चित्रपटात  तिने काम केले. 

Web Title: bahubali devsena anushka shetty is going to marry with an indian cricket team player

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.