OMG! बॉलिवूडचा हा अभिनेता चक्क दिल्लीच्या चोर बाजारातून विकत घ्यायचा सामान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 07:59 PM2019-10-14T19:59:37+5:302019-10-14T20:00:09+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्याने त्याच्या करियरची सुरूवात हिंदी मालिकेतून केली होती.

Baahubali Actor Sharad Kelkar Says In College Days Buy Branded Shoes From Delhi Chor Bazaar | OMG! बॉलिवूडचा हा अभिनेता चक्क दिल्लीच्या चोर बाजारातून विकत घ्यायचा सामान

OMG! बॉलिवूडचा हा अभिनेता चक्क दिल्लीच्या चोर बाजारातून विकत घ्यायचा सामान

googlenewsNext

चित्रपट व टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता शरद केळकर लवकरच 'हाऊसफुल ४' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा सिनेमा २६ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

टाईम्स ऑफ इंडिया वेबसाईटच्या रिपोर्टनुसार शरद केळकरने मुलाखतीत त्याच्या खासगी जीवनातील गोष्टींबद्दल सांगितलं. शरद नुकताच दिल्लीत होता त्यावेळी त्याने ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तुम्ही हैराण व्हाल.

शरद म्हणाला की, तो दिल्लीच्या चोर बाजारातून सामान विकत घेत होता. ते ठिकाणी ब्रॅण्डेड शूज व स्वस्त कपड्यांसाठी ओळखलं जातं. कॉलेजमध्ये असताना तिथून सामान विकत घेत असल्याचं सांगितलं.


शरद पुढे म्हणाला की, मी ग्वालियरला राहणारा आहे आणि तिथे मी स्पोर्ट्स कॉलेजमध्ये होतो. त्यावेळी माझ्याकडे इतके पैसे नव्हते. त्यामुळे मी आठवड्याच्या शेवटी आम्ही चोर बाजारात जाऊन ब्रॅण्डेड शूज विकत घेण्यासाठी दिल्ली येत होतो. रात्रभर फिरून मग चोर बाजारात जायचो. करीमच्या दुकानात खाण्यासाठी थांबायचो. दिल्ली शहर माहित आहे पण तरीदेखील नेहमीच रस्त्यांच्याबाबतीत गोंधळायला होते.


शरद केळकरने २००४ साली 'आक्रोश'  मालिकेतून पदार्पण केले होते. त्यानंतर  'सीआईडी', 'भाभी', 'उतरन', 'पति पत्नी और वो', 'बैरी पिया', 'कुछ तो लोग कहेंगे', 'एजेंट राघव' या मालिकेत काम केले आहे.

याशिवाय त्याने चित्रपटातही आपले नशीब आजमावले आहे. 'हलचल', 'हीरो',मोहन्जोंदारो', 'गेस्ट इन लंदन', 'बादशाहो' या चित्रपटात त्याने काम केले आहे.

Web Title: Baahubali Actor Sharad Kelkar Says In College Days Buy Branded Shoes From Delhi Chor Bazaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.