'बाहुबली' प्रभासच्या बहिणीला पाहिले का? दिसते फारच सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 05:03 PM2021-07-23T17:03:19+5:302021-07-23T17:10:59+5:30

प्रभासमुळे त्याची बहिणही चर्चेत आली आहे. प्रभासला एक मोठी बहिण आहे.ती कधीच लाईमलाईटमध्ये येत नाही. तिला प्रसिद्धीपासून दूरच राहणे जास्त आवडते.

Baahubali Actor Prabhas unseen adorable pictures with With Her Sister, check out | 'बाहुबली' प्रभासच्या बहिणीला पाहिले का? दिसते फारच सुंदर

'बाहुबली' प्रभासच्या बहिणीला पाहिले का? दिसते फारच सुंदर

Next

तमिळ आणि तेलूगु सिनेमाचा स्टार प्रभासची लोकप्रियता आधीपासूनच होती. मात्र बाहुबली- द बिगिनिंग आणि बाहुबली- द कन्कल्युजन या सिनेमातील भूमिकेमुळे प्रभास रातोरात सुपरस्टार बनला. देशासह जगभरातील प्रभासची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर पोहचली आहे. तो जे काही करतो त्याची चर्चा होते.

प्रभासच्या फिल्मी करिअरप्रमाणे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यातही रसिकांना प्रचंड उत्सुकता असते. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. प्रभासमुळे त्याची बहिणही चर्चेत आली आहे. प्रभासला एक मोठी बहिण आहे.  प्रगती उपलापती असे तिचे नाव आहे. प्रगती कधीच लाईमलाईटमध्ये येत नाही. तिला प्रसिद्धीपासून दूरच राहणे जास्त आवडते. 

प्रगती दिसायलाही फार सुंदर आहे. सध्या सोशल मीडियावर प्रगतीचे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या फोटोंना चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभास आणि प्रगतीच्या आई-वडिलांचे नाव आहे उपलापती सूर्या नारायण राजू आणि सिवा कुमारी.

प्रभासचे कुटुंबाचे फोटोही इंटरनेटवर पाहायला मिळतात. इतकेच नाही तर कुटंबासह खास सेलिब्रेशनचे फोटोही तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. प्रभास सतत त्याच्या कामात बिझी असतो. आपल्या कुटुंबाला पूर्वीप्रमाणे फारसा वेळ द्यायला मिळत नसला तरी आवर्जुन शुटिंगमधून वेळ काढत पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देतो. 

गेल्या काही वर्षांपासून प्रभास त्याच्या लग्नामुळेही चर्चेत आहे. चाहत्यांचे तो लग्न कधी करणार याकडेच लक्ष लागले आहे. अनेकदा त्याच्या लग्नाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. सिनेमाच्या व्यस्त शेड्युअलमुळे त्याच्या लग्नाचा मुहुर्त ठरत नसल्याचे समोर आले होते. काही महिन्यांपूर्वी प्रभास  अमेरिकेत राहत असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीच्या फाऊंडरच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. याकरता दोन्ही कुटुंबातील या लग्नाला परवानगी दिल्याचेही बोलले गेले होते.

दरम्यान प्रभासने अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत लग्न करावे अशी ईच्छा व्यक्त करताना दिसतात. दोघांचीही केमिस्ट्री रसिकांना आवडली होती. त्यामुळे दोघांनीही रिअल लाईफमध्ये लग्न करावे अशा चर्चा रंगतात

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Baahubali Actor Prabhas unseen adorable pictures with With Her Sister, check out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Prabhasप्रभास