बॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ सध्या ‘बागी 3’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘वॉर’च्या यशानंतर ‘बागी 3’मध्ये टायगर पुन्हा एकदा दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. साहजिकच टायगरचे चाहते उत्सुक आहेत. पण टायगरचे काय? टायगर मात्र ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ फ्लॉप झाल्याने दु:खी आहे. होय, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ फ्लॉप झाल्याचे दु:ख टायगर अद्यापही विसरू शकलेला नाही.

एका ताज्या मुलाखतीत टायगरला ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ फ्लॉप होण्यामागचे कारण विचारले गेले. यावर त्याने एक धक्कादायक खुलासा केला.  ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ फ्लॉप होण्याचे कारण त्याने सांगितले. तो म्हणाला, ‘ हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर माझ्या अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. या सर्व चाहत्यांचे एकच म्हणणे होते. ते म्हणजे, कॉलेजच्या मुलांकडून मी मार खातोय, हे पाहणे त्यांना खटकले होते. तू वन मॅन आर्मी सारखा शत्रूंशी भिडतो, मशीनसारखा तुटून पडतो आणि आता कॉलेजच्या मुलांकडून मार खातोय, हे आम्ही पचवू शकत नाही, अशा आशयाच्या अनेक कमेंट्स मला चाहत्याकडून मिळाल्या होत्या. कुठे तरी मीच चाहत्यांची निराशा केली होती. ’

एकंदर काय, तर टायगरची धमाकेदार अ‍ॅक्शन पाहण्यास सरावलेल्या चाहत्यांना त्याला कॉलेज बॉय रूपात पाहणे जड गेले आणि ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’चा प्रयोग फसला. अर्थात आता ‘बागी 3’मध्ये टायगर पुन्हा एकदा अ‍ॅक्शन घेऊन येतोय. हा सिनेमा पाहिल्यानंतर चाहते ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ विसरतील, हीच अपेक्षा.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: baaghi 3 star tiger shroff reveals the reason why student of the year 2 film failed at the box office-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.