ठळक मुद्देमी आत गेल्यानंतर मला सगळीकडे गुलाबी रंगाच्याच गोष्टी दिसायला लागल्या आणि मला एक महिलेचा फोनवर बोलतानाचा आवाज ऐकू आला. माझ्या लगेचच लक्षात आल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो आणि पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेलो.

बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना सध्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका मुलीचाही रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्याचे चाहते ड्रीम गर्ल चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमानने दिलेल्या एका मुलाखतीत एक खळबळजनक खुलासा केला आहे.

आयुषमान एकदा चक्क चूकून लेडीज बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. याविषयी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, चंडिगडमधील एका मॉलच्या ग्राऊंड फ्लोअरला उजव्या बाजूला पुरुषांसाठी टॉयलेट होते आणि डाव्या बाजूला महिलांसाठी... पण पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला महिलांचे आणि डाव्या बाजूला पुरुषांचे टॉयलेट होते. त्यामुळे माझ्या लक्षात आले नाही. मी आत गेल्यानंतर मला सगळीकडे गुलाबी रंगाच्याच गोष्टी दिसायला लागल्या आणि मला एक महिलेचा फोनवर बोलतानाचा आवाज ऐकू आला. माझ्या लगेचच लक्षात आल्यानंतर मी तिथून बाहेर पडलो आणि पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेलो. 

काही दिवसांपूर्वी ड्रीम गर्ल चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत आयुषमान चित्रपटातील मुलीच्या गेटअपसाठी कसा तयार होतो, हे दाखवण्यात आलं आहे. एक मिनिटं ४५ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये ड्रीम गर्ल चित्रपटातील काही सीन्स आपल्याला पाहायला मिळतात. या व्हिडिओत आयुषमानचा मेकअप करताना दाखवण्यात आले असून आयुषमान बोलताना दिसत आहे की, महिलांसारखं तयार होणं खूप मोठं टास्क आहे. मला या चित्रपटासाठी दररोज दाढी करावी लागत असे. थोडीफार वाढली तरी पुन्हा दाढी करावी लागत असे. मला साडी नेसवली जात असे आणि नकली केस लावावे जात असे. मला तयार व्हायला साडे तीन तास लागत होते.

या व्हिडिओत चित्रपटातील स्टारकास्ट एकमेकांची मस्करी करताना दिसत आहेत. ड्रीम गर्ल सिनेमात आयुषमान महिला आणि पुरुष अशा दोन अंदाजात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबाबत आयुषमान सांगतो, महिलांच्या आवाजात बोलण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. महिलांसारखे बोलण्यासाठी अभ्यास करावा लागला.  

ड्रीम गर्ल चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या ट्रेलरमध्ये आयुषमान कॉल सेंटरमध्ये काम करत असतो. जिथे तो मुलींच्या आवाजात पुरुषांसोबत बोलत असतो. या ट्रेलरमध्ये आयुषमान साडी नेसताना दिसला आहे.


Web Title: Ayushmann Khurrana on Mistakenly Entering Ladies Bathroom: Everything Around Me Was Pink
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.