ठळक मुद्देआयुषमानने नमूद केले की, अजूनपर्यंत मी कोणत्याच चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. पण मला जर अशी संधी मिळाली तर नकारात्मक भूमिका करायलाही मी मागेपुढे बघणार नाही.

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे.सध्या ‘बाला’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असलेले आयुषमान खुराना, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ते त्यांच्या चित्रपटाबाबत कपिल शर्मासोबत मनसोक्त गप्पा मारणार आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या बाला या चित्रपटाविषयी गप्पा मारण्यासोबतच ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यातील अनेक गुपिते या कार्यक्रमात सांगणार आहेत.दिलखुलास गप्पा मारताना आयुषमानने नमूद केले की, अजूनपर्यंत मी कोणत्याच चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. मी बर्‍याच विनोदी चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे मी गंभीर किंवा नकारात्मक भूमिका करेन असे माझ्या फॅन्सना वाटत नाही. पण मला जर अशी संधी मिळाली तर नकारात्मक भूमिका करायलाही मी मागेपुढे बघणार नाही.आपल्याला वेगवेगळ्या थीमवर प्रयोग करायला आवडतात असे देखील आयुषमानने या कार्यक्रमात सांगितले. त्याच्या आगामी एका चित्रपटाबद्दल बोलताना तो सांगतो, “लैंगिकतेवर आधारित असलेला ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा माझा पुढचा चित्रपट असाच अनोखा प्रयोग आहे.” शो मध्ये पुढे कपिलने आयुष्मान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बाला या चित्रपटाच्या वेशात घरी गेला, तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला ओळखले नाही या अफवेबद्दल चौकशी केली. त्यावर आयुषमान म्हणाला, “हे चुकीचे आहे. खरे तर माझ्या बाबतीत असे घडावे अशी माझी इच्छा होती. पण आम्ही लखनऊ आणि कानपूर यांसारख्या शहरांमध्ये शूटिंग करत होतो. त्यामुळे घरी परत जायला मला फारसा वेळ मिळत नसे.” आयुषमानने त्याच्या या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण उत्तर प्रदेशात केले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील भाषा त्याला चांगली कळायला लागली आहे. “आता मी देखील उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवू शकतो असे त्याने या कार्यक्रमात मस्करीत सांगितले. भूमीने त्याच्या या बोलण्याला समर्थन दिले कारण तिने देखील चित्रपटांचे बरेच चित्रीकरण उत्तर प्रदेशात केले आहे आणि येथील बोली भाषा तिलासुद्धा चांगली कळायला लागली आहे. त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल नमूद करताना आयुषमान म्हणाला, “बालाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार व्हायला मला जवळपास अडीच तास लागत असत.

Web Title: Ayushmann Khurrana Looking for Negative Roles confess in the kapil sharma show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.