बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना त्याच्या करियरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यात विक्की डोनर, बधाई हो, अंधाधुन यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. मागील महिन्यात 'ड्रीम गर्ल' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आयुषमान म्हणाला की, 'जर त्याला लॉकर मिळाला तर त्यात तो 'विक्की डोनर' व 'अंधाधुन' चित्रपटाची स्क्रीप्ट सांभाळून ठेवायची आहे.' आयुषमानचे ६ सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली आहेत.

आयुषमानची 'ड्रीम गर्ल'मधील भूमिका रसिकांना खूपच भावली आहे. त्यानंतर आता तो आगामी चित्रपट बालामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाबाबत तो खूप उत्सुक आहेत. तसं तर आयुषमान नेहमीच सामान्य व्यक्तीची भूमिका साकारण्याला प्राधान्य देेतो.
आता तो त्याच्या चाहत्यांना भविष्यात निगेटिव्ह भूमिका साकारतानाही दिसेल. एका मुलाखतीत आयुषमानने इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, 'काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हॉलिवूड चित्रपट 'जोकर'च्या हिंदी व्हर्जनमध्ये मला निगेटिव्ह भूमिका साकारायची आहे.'


तो पुढे म्हणाला की, 'प्रेक्षकांनी माझी डार्क साइड अद्याप पाहिलेली नाही. आता मला निगेटिव्ह भूमिका साकारायची आहे. जसे की जोकरचे देसी व्हर्जन. मला ते पात्र खूप आकर्षित करत आहे. ते आपल्या पर्सनॅलिटीतील सर्व पैलू दर्शवितो. जोकरचे भारतीय व्हर्जन बनवण्यासाठी तुम्हाला पटकथा लेखक आणि एका दिग्दर्शकाच्या पाठिंब्याची गरज आहे. ज्याचं ध्येय हॉलिवूड चित्रपट जोकरसारखं असलं पाहिजे'. तसेच आयुषमानने त्याच्या हिंदी कवितांच्या पुस्तक प्रकाशन करण्याची ईच्छादेखील व्यक्त केली आहे.


आयुषमानचा आगामी सिनेमा 'बाला' ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Ayushman Khurana wants to play negative Role, read article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.