बॉलीवुडमध्ये ९०च्या दशकात अभिनेत्री आयशा जुल्का रुपेरी पडद्यावर झळकली. मात्र त्या काळी काही मोजक्याच सिनेमांतून  रसिकांवर मोहिनी घालण्यास यशस्वी ठरली होती. मात्र या सगळ्यांमध्ये आयशा चित्रपटसृष्टीत नाना पाटेकरांसोबत बोल्ड सीन दिल्यामुळे तुफान चर्चेत आली होती. आमिर खानसह 'जो जीता वही सिकंदर' सिनेमात आयशा झळकली होती. आजही याच सिनेमामुळे ती आजही रसिकांच्या लक्षात आहे. 

आयशाने तिच्या आयुष्यात कडक शिस्तीचे पालन करायची. करिअरमध्येही ज्या गोष्टी तिला आवडत नाही त्या ती करायची नाही. दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, 'प्रेम कैदी' सिनेमात बिकीनी सीन द्यायचा होता. जे तिला मान्य नव्हते. त्यामुळे तिने त्या सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. तसेच रोजा सिनेमाही तिने नाकारला होता. त्यानंतर तिला या गोष्टीचा पश्चातापही झाला होता.

 

आयशा आज बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी इंडस्ट्रीतील काही कलाकारमंडळींच्या ती संपर्कात असते. जॅकी श्रॉफसह आयशाची चांगली मैत्री आहे. जॅकी श्रॉफ सोशल वर्कमध्येही खूप अॅक्टीव्ह आहेत. त्यांच्यासह ती देखील काम करत असते. आजही टीव्ही, वेबसिरीजसाठी तिला ऑफर्स येत असल्याचे ती सांगते मात्र हवे तशा भूमिका नसल्याने त्याही ऑफर्स ती स्विकारत नाही. आयशा आता अभिनय करण्यात फारशी इच्छुक नसली तरी स्क्रीप्ट लिहीण्याचे काम करते. 

आयशा जुल्काने 2003 साली समीर वाशीसह लग्न केले. लग्नानंतर ती संसारात रमली आणि स्वत: ला अभिनयापासून दूर ठेवले. याविषयी बोलताना आयशा म्हणाली- मी अगदी लहान वयातच सिनेमांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि मला एक सामान्य आयुष्य जगण्यात रस आहे. जास्त लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नव्हेत. त्यामुळे बॉलिवूडपासून दूर झाल्यानंतर आनंदी आयुष्य जगत आहे. बॉलिवूडपासून दूर जात खाजगी आयुष्यात रमली हा त्यावेळी मी घेतलेला एक चांगला निर्णय होता.


आयशा 48 वर्षांची आहे. लग्नानंतर तिला एकही मूल नाही. याबद्दलही तिने सांगितले होते की, मला मूल नको होते. मी जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. माझा हा निर्णय कुटुंबानेही मान्य केला होता. पतीनेही मला समजून घेतले. माझा पती समीर एक समजूतदार व्यक्ति आहे. आता माझा बराच वेळ मी  समाजसेवेत  घालवते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ayesha Jhukla Left This Movie As She Had To Wear Bikini In The Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.