बॉलिवूडला आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवार, 12 नोव्हेंबरला प्रसिद्ध अभिनेता आसिफ बसरा यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 53 वर्षीय अभिनेता डिप्रेशनमध्ये होते. आसिफ बसरा यांच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्याला सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.
ट्विटरवरुन अनेक सेलेब्सनी आसिफ यांच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माता हंसल मेहता यांना इतका मोठा धक्का बसला आहे की त्याने ही बातमी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी लिहिले- 'आसिफ बसरा! हे सत्य असू शकत नाही .... ही अत्यंत, अत्यंत वाईट बातमी आहे.
अभिनेते मनोज बाजपेयीने लिहिले- 'काय? हे खूप धक्कादायक आहे !! लॉकडाऊनपूर्वी मी त्याच्याबरोबर शूट केले होते. ओह माय गॉड
अभिनेत्री स्वरा भास्करने खूप साऱ्या इमोजीसोबत लिहिले-, 'noooooooooo'
इमरान हश्मीने लिहिले- RIP आसिफ भाई
कोण आहे आसिफ बसरा
आसिफ बसरा हे टीव्हीचा एक लोकप्रिय चेहरा होता. बॉलिवूडच्या अनेक सिनेमात त्याने काम केले आहे. परजानियां, ब्लॅक फ्राईडे या सिनेमात त्याने काम केले होते. हॉलिवूड सिनेमा ‘आऊटसोर्स’मध्येही तो दिसला होता. हिमाचली सिनेमा सांझमधील त्यांचा अभिनय विशेष गाजला होता. इमरान हाश्मीच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सिनेमात त्याने इमरानच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Asif basra suicide hansal mehta manoj bajpayee bollywood celebrities in shock after hearing the news
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.