Aryan Khan Drug Case: माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं...; १३ वर्षांपूर्वीच शाहरुखनं व्यक्त केली होती भीती; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:44 PM2021-10-23T12:44:43+5:302021-10-23T12:47:34+5:30

Aryan Khan Drug Case: २००८ मध्ये शाहरुखनं दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल

Aryan Khan Drug Case old interview shahrukh khan opened up about his fame and its possible impact on his children | Aryan Khan Drug Case: माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं...; १३ वर्षांपूर्वीच शाहरुखनं व्यक्त केली होती भीती; व्हिडीओ व्हायरल

Aryan Khan Drug Case: माझी प्रसिद्धी माझ्या मुलांचं...; १३ वर्षांपूर्वीच शाहरुखनं व्यक्त केली होती भीती; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

मुंबई: क्रूझ शिपवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीतून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला तीन आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली. तेव्हापासून आर्यन तुरुंगात आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. आर्यननंतर चित्रपटसृष्टीतील आणखी काही बडे मासे एनसीबीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. अभिनेत्री अनन्या पांडेची सलग दोन दिवस चौकशी झाली आहे. आर्यन खानचा पाय दिवसागणिक खोलात जात असताना शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शाहरुख खाननं १३ वर्षांपूर्वी एका जर्मन वाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात शाहरुखनं आपल्या मनातील सर्वात मोठी भीती बोलून दाखवली. मला मिळत असलेली प्रसिद्धी माझ्या मुलांचं आयुष्य खराब करू शकते आणि असं कधीच घडू नये असं मला वाटतं, अशी भावना त्यावेळी शाहरुखनं व्यक्त केली होती. शाहरुखला १३ वर्षांपूर्वी वाटलेली भीती आज खरी ठरली आहे.

माझ्या मनात असलेली सर्वात मोठी भीती माझ्या मुलांबद्दल आहे, असं शाहरुख जर्मन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. 'माझ्या प्रसिद्धीचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ नये हीच माझी इच्छा आहे. त्यांचा वडील म्हणून माझी ओळख व्हावी असं मला वाटतं. शाहरुखची मुलं अशी त्यांची ओळख समाजात होऊ नये. त्याऐवजी त्यांच्यामुळे लोकांनी मला ओळखावं असं मलापासून वाटतं,' असं शाहरुखनं म्हटलं होतं. 

Web Title: Aryan Khan Drug Case old interview shahrukh khan opened up about his fame and its possible impact on his children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.